डॉक्टरने उचलला बाळंत मातेच्या आईवर हात
सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली. येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडित कुटुंबातील एक सदस्य चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात असून, याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच हा प्रयत्न झालेला असावा, अशी माहिती दिली जात आहे. ही घटना शहरातील महिदपूर परिसरात घडली.
शहरातील महिधरपुरा भागात राहणारे दिलीप करसन वढेर यांची चोरीच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे. याच्या निषेधार्थ कुटुंबीयांनी हे पाऊल उचलले. दिलीपच्या मेहुण्याने पोलिस ठाण्याच्या बाहेर विष प्यायल्याचे सांगितले जात आहे, तर आई आणि पत्नीने घरात विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
महिधरपुरा पोलिस ठाण्यात 8 ऑगस्ट रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिलीपला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे.
आरोपीच्या आई, वहिनी आणि पत्नीने घेतले विष
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, दिलीप करसन वढेर हा चोरीच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत आहे. त्यामुळे त्याची आई, वहिनी आणि पत्नीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरोपीचा भाऊ पोलिस ठाण्याजवळ बसला असताना त्याने पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्वांना स्मीर रुग्णालयात दाखल केले.
सर्वांची प्रकृती स्थिर
या सर्वांनी विष प्राशन केल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने या सर्वांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी देखील या सर्वांवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. त्यामुळे या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती दिली जात आहे.