Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: नात्याला काळिमा! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर आक्षेपार्ह फोटो काढले, वैजापूरमध्ये विवाहित पीडितेवर अत्याचार

Vaijapur Crime News; वैजापूर तालुक्यात नात्यातीलच महिलेला गुंगीचे औषध देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 05, 2026 | 03:12 PM
वैजापूरमध्ये विवाहित पीडितेवर अत्याचार (Photo Credit - X)

वैजापूरमध्ये विवाहित पीडितेवर अत्याचार (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • नातलगाकडूनच विवाहितेवर अत्याचार
  • आक्षेपार्ह छायाचित्रे पतीला दाखविण्याची धमकी
  • आरोपीस कोठडी
Vaijapur Crime News: नात्यातीलच एका ३० वर्षीय विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढणे आणि त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तालुक्यातील भिवगाव येथील रहिवासी असून तिचे २०११ मध्ये लग्न झाले आहे. आरोपी हा पीडितेच्या चुलतमामाचा मुलगा आहे. नातेवाईकांच्या कार्यक्रमांनिमित्त त्याचे पीडितेच्या घरी येणे-जाणे वाढले होते. २०२० नंतर त्यांच्यात फोनवर संवादही सुरू झाला. त्यानंतर ते दोघे फोनवर एकमेकांशी बोलू लागले.

असा रचला अत्याचाराचा सापळा

एका दिवशी पीडित महिलेच्या घरी कोणी नसतांना ‘तो’ तिच्या घरी आला व म्हणाला की, ‘माझ्यासाठी लिंबू शरबत कर’ तिनेही दोन लिंबू शरबत करून आणले. या घाईगडबडीत त्याने तिला पिण्यासाठी पाणी मागितले होते. ती पाणी आणण्यास आत गेली असता त्याने तिच्या शरबतमध्ये गुंगीचे औषध टाकून दिले. पीडितेने ते शरबत पिताच ती बेशुद्ध झाली. यानंतर तिला काहीच समजले नाही. यावेळी त्याने तिचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढली.

हे देखील वाचा: Nagpur Crime: प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी

ब्लॅकमेलिंग आणि वारंवार अत्याचार

त्यानंतर चार दिवसांनी तो पुन्हा तिच्या घरी आला. त्याने काढलेले आक्षेपार्ह छायाचित्रे पीडितेला दाखवून म्हटला की, ‘हे फोटो मी तुझ्या पती, सासू व नातेवाईकांना दाखवितो’ मात्र यावर महिलेने त्याला ‘तुला काय पाहिजे?’ अशी विचारणा केली. तेव्हा त्याने ‘तू माझ्या सोबत बाहेर चल’ असे म्हणून तिला म्हैसमाळ येथील एका लॉजवर नेले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार अशीच धमकी देऊन त्याने तिच्यावर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन वेळोवेळी अत्याचार केला. यानंतर छायाचित्र नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देत त्याने पीडितेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.

सततच्या प्रकाराला कंटाळून पोलिसांत धाव

अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून एके दिवशी महिलेने सर्व हकीकत तिच्या काकाला व अन्य नातेवाईकांना सांगितली. त्यांनीही त्याला समजविले. मात्र त्याच्या वागण्यात काही एक फरक पडला नाही. अखेर पीडितेने वैजापूर पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा: Dhule Crime: धुळ्यात तुफान दगडफेक आणि गोळीबार! शीख धर्मियांच्या दोन गटात तुफान राडा, कारण काय?

Web Title: Married woman assaulted in vaijapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news
  • Vaijapur

संबंधित बातम्या

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?
1

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; ‘तो’ मेसेज आला अन्…
2

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; ‘तो’ मेसेज आला अन्…

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट
3

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप
4

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.