Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांवर दहशत माजवून मोठे झालेले गुन्हेगार; टिपू पठाण अन् बंटी पवार टोळीचा ‘असा’ आहे गुन्हेगारी इतिहास

कोंढव्यातील टिपू पठाण अन् सिंहगडमधील बंटी पवार या टोळ्या. वर्चस्वातून न मोठ्या होता, सर्व सामान्यांवर दहशत माजवून मोठ्या झालेल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2025 | 12:08 PM
सर्वसामान्यांवर दहशत माजवून मोठे झालेले गुन्हेगार; टिपू पठाण अऩ् बंटी पवार टोळीचा 'असा' आहे गुन्हेगारी इतिहास

सर्वसामान्यांवर दहशत माजवून मोठे झालेले गुन्हेगार; टिपू पठाण अऩ् बंटी पवार टोळीचा 'असा' आहे गुन्हेगारी इतिहास

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • सर्वसामान्यांवर दहशत माजवून मोठे झालेले गुन्हेगार
  • वाचा टिपू पठाण अऩ् बंटी पवार टोळीचा गुन्हेगारी इतिहास
पुणे/अक्षय फाटक : बंडू आदेकर, प्रमोद माळवदकर, बाबा बोडके, गजानन मारणे, निलेश घायवळ, गणेश मारणे, बापू नायर, शरद मोहोळ अशा एक – ना एक गुन्हेगार टोळ्यांवर अंकुश लावण्याचे प्रयत्न होत असतानाच विस्तारणाऱ्या पुण्याच्या विविध भागात नव्याने गुंड अन् नंतर त्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या. त्यातील कोंढव्यातील टिपू पठाण अन् सिंहगडमधील बंटी पवार या टोळ्या. या दोन्ही टोळ्या इतर मोठ्या टोळ्यांशी किंवा वर्चस्वातून न मोठ्या होता, सर्व सामान्यांवर दहशत माजवून मोठ्या झालेल्या. तस मोठ्या टोळ्यांशी पंगा नसला तरी गुन्हेगारी जगतात त्यांनी टोळीप्रमुख म्हणून ओळख निर्माण केली. खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांवर धाक अन् दहशत बसवून आडमार्गाने पैसा कमावला.

रिजवान उर्फ टिपु सत्तार पठाण मुळचा लोणी काळभोरचा. पठाण कुटूंब काही वर्षांपुर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी वानवडी येथील सय्यदनगरमध्ये आले. पण, २०१३ मध्ये टिपू पठाण व त्याच्या मित्रांनी एकाचा खून केला. याप्रकरणात हडपसर पोलिसांकडे गुन्हा नोंद झाल्यानंतर टिपू पठाण गुन्हेगारी जगतात आला. तोपर्यंत टिपू पठाण कोण असा प्रश्न होता. पण, एका खूनानंतर टिपू पठाण या भागातील भाई झाला. पाहता पाहता, त्याने गुन्हेगारांसोबत एक टोळी निर्माण केली आणि तो या टोळीचा प्रमुख देखील झाला.

१३ गुन्ह्यांची नोंद

टिपू पठाणने खूनानंतर बंडगार्डन, हडपसर, वावनडी, सातारा शहर व ग्रामीण भागात देखील गुन्हे केले. मारामाऱ्या, खूनाचे प्रयत्न आणि खंडणी अशा वेगवेगळ्या प्रकरणात त्याच्यावर व टोळीवर १३ गुन्हे दाखल झाले. तोपर्यंत टिपू पठाण याचे नाव गुन्हेगारी जगतात मोठे झाले होते.

गोळीबार अन् मोक्का कारवाई

वानवडी, हडपसर, कोंढवा तसेच काळेपडळ भागात दहशत असणाऱ्या टिपू पठाण व त्याच्या टोळीने आर्थिक वादातून एकावर २०१९ मध्ये गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात तरुण बचावला, पण याप्रकरणात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला व पहिली मोक्का कारवाई टिपू पठाण टोळीवर झाली. परंतु, वानवडी पोलिसांकडे दाखल असलेल्या या गुन्ह्यातून टिपू पठाण व त्याच्या टोळीची २०२२ मध्ये निर्दोश मुक्तता झाली. त्यानंतर तो बाहेर आला.

मोक्काचा शिक्का अन् दहशत

पोलिसांच्या मोक्का कारवाईचे लेबल एखाद्या गुन्हेगाराला लागल्यानंतर त्याची दहशत कमी होण्यापेक्षा वाढतच जाते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. तशी टिपू पठाणची देखील या भागात दहशत वाढत गेली. त्याने या दहशतीच्या जोरावर जमीन बळकावण्याचे काम सुरू केले. व्याजाचा धंदा अन् खंडणी यामाध्यातून गुन्हेगारी सुरू ठेवली. पोलिसांच्या मते त्याची दहशत इतकी होती की तक्रार करण्यास देखील पुढे कोणी येत नसत.

टिपू पठाण कारागृहात

एका महिलेच्या जमीन ताबा प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर पुणे पोलिसांनी टिपू पठाण व त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई केली. टिपू पठाणसह त्याच्या टोळीतील साथीदारांना अटक केली. सध्या टिपू पठाणसह टोळी कारागृहात आहे.

एकाचा एन्काऊंटर

टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई झाल्यानंतर त्यातील ८ जण फरार होते. त्यांचा शोध सुरू होता. तेव्हा गुंड शाहरूख उर्फ अट्टी रहीम शेख हा मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात असल्याच्या माहितीवरून पुणे पोलिस त्याला पकडण्यास गेले होते. तेव्हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत शाहरूख याचा एन्काऊंटर झाला होता. पोलिसांच्या या एन्काऊंटरनंतर गुडांच्या मनात धडकी भरली होती.

टिपूप्रमाणेच विस्तारत चालेल्या सिंहगड रोड भागात बंटी उर्फ महेश पवार याची टोळी देखील पोलिसांच्या नोंदीत आहे. या टोळीचे वैशिष्ट्य देखील प्रतिस्पर्धी टोळी नाही. पण, बंटी पवार टोळीत २९ सदस्य आहेत. बंटी पवार मुळचा वडगाव भागातील. पण, रहिवास हिंगण्यातील तुकाईनगर भागात. बंटी पवार याचा भाऊ गुन्हेगार होता. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर बंटी पवार हा गुन्हेगारीत आला. त्याने स्वतची टोळी निर्माण केली. खून, मारामाऱ्या, दरोडा असे गुन्हे दाखल असलेल्या बंटी पवार याची सिंहगड रोड परिसरात दहशत आहे. २०२१ पासून बंटी पवार एनडीपीएसच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.

Web Title: Tipu pathan and bunty pawar gangs have committed many crimes in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार करून खून; मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावरही हल्ला
1

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार करून खून; मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावरही हल्ला

धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; साहित्याच्या बहाण्याने जायचा अन्…
2

धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; साहित्याच्या बहाण्याने जायचा अन्…

पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर
3

पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक
4

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.