
पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर
केतन वसंत जगताप (वय ३५, रा. बुद्रुक जगतापआळी, खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी केतनच्या २९ वर्षीय पत्नीने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुपारी अडीचच्या सुमाराल ही घटना घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, केतन व पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाले होते. त्यामुळे पत्नी माहेरी आलेली होती. पत्नी खडकीतील आई-वडिलांच्या घरी राहत होती. दरम्यान, घटनेच्या दिवशी केतन हा त्याच्या दुचाकीवर आला. त्याने डिक्कीत तीक्ष्ण शस्त्र ठेवले होते. दरम्यान, त्याने पत्नीला शिवीगाळ करत संशय घेतला आणि तिच्यावर डोक्यावर आणि हातावर सपासप वार करून खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर तो पसार झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पसार झालेल्या केतन याला अटक केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.