Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: ही दोस्ती तुटायची नाय! पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवायला गेला, शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

तलावाच्या काठावर बसले असताना अचानक एका मुलाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्यानेही पाण्यात उडी घेतली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 25, 2026 | 11:59 AM
Accident News: ही दोस्ती तुटायची नाय! पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवायला गेला, शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू
Follow Us
Follow Us:

Sangali Accident News: जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन शाळकरी मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.हर्षद संजय कांबळे (वय १६) आणि जगदीश वसंत मोरे (वय १५) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हर्षदने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीश नववीत शिक्षण घेत होता. दोघेही एकत्र तलावावर गेले असताना ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सनमडी येथील साठवण तलावाचा मत्स्य ठेका कुणीकोनूर येथील संजय कांबळे यांच्याकडे आहे. शुक्रवारी ते आपल्या मुलीच्या सीईटी परीक्षेसाठी विटा येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या जागी काम करणारा मजूर तलावावर मासेमारीसाठी गेला होता. त्याच्यासोबत हर्षद कांबळे आणि त्याचा भाचा जगदीश मोरे हे दोघेही गेले होते.

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा; उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्या रिकाम्या

तलावाच्या काठावर बसले असताना अचानक एका मुलाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले; परंतु तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Buldhana News: बुलढाण्याची राजकीय संस्कृती रसातळाला? संजय गायकवाडांनंतर मुलगा कुणाल गायकवाडांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

मृतदेहांची दिरंगाईमुळे हेळसांड

या घटनेनंतर मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रशासकीय दिरंगाईचा सामना करावा लागला. सुरुवातीला घटना उमदी पोलीस हद्दीत येत असल्याने मृतदेह उमदी येथे नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा सुमारे साठ किलोमीटर अंतरावर जत ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. येथेही शवविच्छेदनासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पंचनाम्यातील काही त्रुटींवरूनही नाराजी व्यक्त करण्यात आली.

सैन्य भरतीचे स्वप्न अपूर्ण

हर्षद कांबळे याने दहावीची परीक्षा दिल्यानंतर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न जोपासले होते. निकालाची प्रतीक्षा करत असतानाच त्याच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

 

Web Title: Tragedy in jat two school students drown in storage tank at sanamadi village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Breaking News

संबंधित बातम्या

Baramati Politics: सुनेत्रा पवारांचा ‘अजितदादा स्टाईल’ दणका! शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
1

Baramati Politics: सुनेत्रा पवारांचा ‘अजितदादा स्टाईल’ दणका! शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

MHT CET PCB Result 2026 जाहीर; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, तुमचे स्कोअरकार्ड पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा
2

MHT CET PCB Result 2026 जाहीर; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, तुमचे स्कोअरकार्ड पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका
3

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा
4

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.