
फोटो सौजन्य सोशल मीडिया
अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे . रेल्वेची डबे रुळावरून घसरून जवळच्या उतारावर कोसळल्यावर बचावकार्य अधिक कठीण झाले आहे . या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
मिळालेल्या माहितीनुसार , सकाळी ८.५४ वाजण्याच्या सुमारास हा भयानक अपघात झाला . रेन्फे ( Renfe ) कंपनीची एव्हीइ ( AVE ) हायस्पीड रेल्वे आयर्यो ( Iryo ) कंपनीच्या रेल्वेला मागून धडकली .आयर्यो रेल्वेमध्ये १४७ प्रवासी ,तर रेन्फे रेल्वेमध्ये ३९७ प्रवासी करत होते . धडकेची तीव्रता इतकी मोठी होती कि काही डबे रुळावरून घसरले आणि उतारावर कोसळले . अपघाताच्या वेळी रेल्वेची हालचाल थांबलेली होती .अशी प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे .
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल , पोलीस , नागरी संरक्षण पथके आणि वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . जखमींना बाहेर काढण्यासाठी विशेष बचाव पथकांची मदत घेतली जात आहे . गंभीर जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी वैद्यकीय हेलिकॉप्टर आणि फिरती अतिदक्षता उपचार यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे . जवळच्या रुग्णालयांना सतर्क करण्यात आले असून आपत्कालीन उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे . अनेक प्रवाशांना डब्ब्यांमधून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत .
Microsoft News : मायक्रोसॉफ्टमध्ये मोठा बदल! ६० हजार कर्मचाऱ्यांसाठी एक्झिट पॅकेज
या दुर्घटनेनंतर माद्रिद आणि दक्षिणेकडील अंडालुसिया प्रांतादरम्यानची हायस्पीड रेल्वे वाहतूक दोन्ही दिशांनी थांबिवण्यात आली आहे . त्यामुळे हजारो प्रवाशांना प्रवासात अडचणीचा सामना करावा लागत आहे . स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून बचावकार्यावर लक्ष ठेवले आहे . दरम्यान रेल्वेची सुरक्षा यंत्रणा आणि सिग्नल व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत . मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरु आहे .