पिंपरी : एका नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आला होती. ही घटना गुरुवारी (5 डिसेंबर) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास चर्होली येथे घडली. अवघ्या 12 तासांच्या आता पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
सचिनकुमार लखीदर राय (23, रा. बंगरी, जि. मुझफ्फरपुर, बिहार) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गौतम रामानंद राय ( 22, रा. तेजस रेसीडन्सी, मंगलनगर, वाकड. मूळगाव मु. बंगरी पो. मरवन ता. काटी जि. मुजफ्फरपूर, राज्य-बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा अल्पवयीन साथीदार (वय 17 वर्ष 6 महिने, रा. मोहीतेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्होली येथे सचिनकुमार राय याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता त्यावरून आरोपी गौतम राय याचे नाव निष्पन्न केले. पोलीस हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून आणि सहायक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून काळाखडक, वाकड येथून पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले.
Babri Demolition 32 Years: बाबरी मशिद विध्वंसाचे 32 वर्षे; वाचा, 6 डिसेंबर 1992 काय झालं होतं?
या प्रकरणात हत्या झालेले सचिनकुमार राय याचे आरोपीचे नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला होता. या कारणावरून नातेवाईक महिलेने घरही सोडले होते. त्यामुळे सचिनकुमार याला धडा शिकविण्यासाठी त्याचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. खंडणी विरोधी पथकाने आरोपीला दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक फौजदार सुनील कानगुडे, अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.
बांगलादेश लष्कराने सीमेवरील ‘चिकन नेक’ भागात KILLER UAV केले तैनात; भारतीय
दुसरीकडे, पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. शिकवणीस आलेल्या शाळकरी मुलीशी अल्पवयीन मुलाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या ३५ वर्षीय आईने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, १४ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आठ वर्षाची मुलगी येरवडा भागात एका महिलेकडे खासगी शिकवणीस जाते. या शिक्षिकेचा १४ वर्षीय चुलतभाऊ तेथे राहायला आहे. आठवड्यापूर्वी शिक्षिका घरी नव्हती. तेव्हा मुलाने मुलीला गच्चीवर नेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. नंतर मुलगी दोन दिवसांपूर्वी शिकवणीसाठी घरी आली. तेव्हाही शिक्षिका घरी नव्हती. त्यावेळी मुलाने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ नाटकाचं हिंदीमध्ये विशेष प्रयोग, केव्हा आणि कुठे होणार प्रयोग ?
चौकशीत शिक्षिकेच्या १४ वर्षीय चुलतभावाने मुलीबरोबर दोनवेळा अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. १४ वर्षीय मुलाविरुद्ध पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका देवकर तपास करत आहेत.