Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karmala Crime News: बाप नाही हैवान! पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Solapur Crime News: सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिंगणी गावात पित्याने आपल्या दोन ८ वर्षीय मुलांची विहिरीत ढकलून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पित्याला बार्शीतून अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 11, 2026 | 03:02 PM
मोठी बातमी ! राज्यात आता विहिरी खोदण्यावर बंदी; राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मोठी बातमी ! राज्यात आता विहिरी खोदण्यावर बंदी; राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:

 

  • बापानेच संपवलं दोन चिमुकल्यांचं आयुष्य!
  • विहिरीत ढकलून पोटच्या मुलांची हत्या
  • आरोपी करमाळा पोलिसांच्या ताब्यात
करमाळा/प्रतिनिधी: करमाळा तालुक्यातील हिंगणी गावात शनिवारी (दि. १०) घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वडिलांनीच आपल्या दोन अल्पवयीन मुलांना शेतातील विहिरीत ढकलल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सुहास जाधव (वय ३२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकी काय घडली घटना?

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास सुहास जाधव हे आपल्या मालकीच्या शेतात गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली मुले शिवांश जाधव आणि श्रेया जाधव (दोघेही वय ८) यांना शेतातील विहिरीजवळ नेऊन त्यांना विहिरीत ढकलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विहिरीत पडल्यानंतर दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर सुहास जाधव हे घटनास्थळावरून फरार झाले होते.

पोलिसांची शोधमोहीम आणि अटक

दरम्यान, काही वेळाने मुलांचा शोध घेत असताना ही घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोधमोहीम राबवून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी सुहास जाधव याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले. काही तासांच्या शोधमोहीमनंतर बार्शी परिसरातून सुहास जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Crime News: वाळूजमध्ये नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवणारे जेरबंद! खवड्या डोंगरावरून पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या

हत्येचे गूढ कायम

दरम्यान, सुहास जाधव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव अथवा अन्य कारणांमुळे ही घटना घडली का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. नातेवाईकांचे जबाब नोंदविणे, गावातील नागरिकांकडून माहिती घेणे तसेच इतर पूरक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

नागरिकांमध्ये तीव्र हळहळ

या घटनेमुळे हिंगणी गावासह करमाळा तालुक्यात शोककळा पसरली असून, लहानग्या मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गावात भीती आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

Web Title: Karmala father pushed two children into well hingni crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • crime news
  • father killed son
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
2

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
3

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
4

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.