Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

सांगली जिल्ह्यात चिनी बेदाण्याची अफगाणिस्तान मार्गे तस्करी होऊन बोगस शेतकऱ्यांच्या नावावर राजरोसपणे विक्री सुरू आहे. नुकताच या विरोधात द्राक्ष बागायतदार संघाने तस्करीचं सत्य उघड केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 11, 2026 | 01:31 PM
Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
Follow Us
Close
Follow Us:
  • खुलेआमपणे बेदाणा तस्करी;
  • सत्ताधारी मूग गिळून गप्प का?
  • आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
सांगली : सांगली जिल्ह्यात चिनी बेदाण्याची अफगाणिस्तान मार्गे तस्करी होऊन बोगस शेतकऱ्यांच्या नावावर राजरोसपणे विक्री सुरू आहे. नुकताच या विरोधात द्राक्ष बागायतदार संघाने तस्करीचं सत्य उघड केलं आहे. यामध्ये काही व्यापारी आणि कोल्डस्टोरेजचा सहभाग असल्याचे पुराव्यासह उघड झाले असताना, बाजार समितीकडून जुजबी करवाई होण्यापलीकडे काहीच झाले नाही, तर राजकीय नेत्यांनी अद्याप न शब्द सुद्धा काढलेला नाही. तस्करी झालेल्या परदेशी बेदाण्याचा भांडाफोड द्राक्ष बागायतदार संघाने केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी याविषयी आवाज उठवणे अपेक्षित होते.

तासगाव, सांगली बाजार समित्यांकडून केवळ जुजबी कारवाई करून ‘नियमन मुक्ती’चा दाखला देत आमची जबाबदारी नसल्याचे सांगितले जात आहे, सांगली, तासगाव येथील सौद्यांवर महाराष्ट्रासह कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा बाजार समितीत होणाऱ्या सौद्यांवर विश्वास आहे. त्यामुळे शेकडो मैलांवरूनदेखील बेदाणा उत्पादक बाजार समितीत येतो. त्यामुळेच बेदाणा नियमन मुक्त झाला तरीदेखील आजही, अपवाद वगळता, बाजार समितीतच बेदाण्याची खरेदी-विक्री होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने बाजार समितीला व्यापाऱ्यावर अंकुश ठेवणे अशक्य नाही; मात्र बाजार समितीची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नाही. त्यात तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मिरज पूर्व आणि आटपाडीच्या काही भागात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनं एकही नेता भूमिका घेताना दिसत नाहीये. जिल्हा प्रशासनाने देखील कोणतीही कारवाई करण्याची भूमिका घेतली नाही, तर जीएसटी, कस्टम सारखे विभागही मूग गिळून गप्प आहेत.

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

सांगलीच्या बेदाण्याला जागतिक स्तरावर ओळख

सांगली जिल्ह्यातील बेदाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तम गुणवत्ता, मोठे उत्पादन आणि निर्यातीतील महत्त्व: येथे थॉम्पसन, माणिक चमन यांसारख्या वाणांपासून उच्च दर्जाचे बेदाणे बनतात, ज्यांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे आणि ते आशियातील सर्वोत मोठ्या बेदाणा बाजारपेठांपैकी एक आहे, ज्यामुळे जिल्ह्याला ‘बेदाणा हय’ म्हणून ओळखले जाते, सांगलीच्या बेदाण्याला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे, ज्यामुळे त्याच्या गुणवतेची आणि विशिष्टतेची खात्री असल्याने बेदाण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे.

अशी होत होती तस्करी

भारतीय बनावटीचा चेहरा दाखवून आतून चीनचा बेदाणा अफगानमार्गे तासगाव आणि सांगली येथील बाजारात आणला गेला, कोल्डस्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात हा बेदाणा आणला गेला, ज्याचे कोणतेही (रेसिड्यू फ्री) अवशेषमुक्त तपासणी करण्यात आलेला नाही. तो छुप्या मार्गाने आलेला आहे. यापासून ग्राहकांच्या जीविकास धोका निर्माण करून राजरोज काळाधंदा शासनाचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेऊन उभारलेल्या कोल्डस्टोरेजच्या आडून सुरू आहे. महाराष्ट्र आणि केंद्र शासनाचे अनुदान घेऊन हे व्यपारी देशद्रोही कारवाया करीत आहेत, दुसरीकडे बाजारात स्थानिक बेदाण्याचे दर पडून शेतकरी देशोधडीला लागत आहेत.

Nitesh Rane News: नितेश राणेंच्या घराबाहेर बेवारस बॅग अन् एक चिठ्ठी….; घातपाताचा प्रयत्न की आणखी काही

Web Title: Sangali news open smuggling of dry blackcurrants why are the ruling party silent angry question from aggressive farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड
1

गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड

Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती
2

Vasai Virar Election: सत्तेसाठी काहीही? वसई-विरारचा ‘गड’ राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची वादग्रस्त नेत्याशी युती

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो
3

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो

Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली
4

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.