crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नांदेड पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वैश्य व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर छापा टाकून धंद्यात गुंतलेल्या महिलांसह अनेकांना अटक केली आहे. हा प्रकार नांदेडमधील गजबजलेल्या तरोडेकर मार्केट परिसरात उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील वजिराबादमधील तरोडेकर मार्केटमधील फ्युजन स्पा सेंटर काही महिन्यांपासून सुरु होते. स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी नांदेड पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला आहे. संबंधित ग्राहकाला ठरलेल्या पद्धतीने स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ग्राहकाने आत जाऊन खात्री पटवून घेतल्यानंतर लगेच पोलिसांना संपर्क साधला.
नंतर पोलिसांच्या पथकाने स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. या छाप्यात दोन तरुणी आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले.एक महिला, तीन युवती, चार पुरुष तसेच स्पा सेंटरचा चालक आणि कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी काही रोक रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नांदेड पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, शहरातील स्पा, मसाज पार्लर आणि सलून यांची तपासणी मोहीम सुरू आहे. नियमांचे उल्लंघन किंवा अनैतिक व्यवसाय सुरु असल्याचं आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावी, असं आवाहनही नांदेड पोलिसांनी केलं आहे.
नांदेडमध्ये जादूटोणा! चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा विडा खाल्यानंतर शरीराला आणि मनाला वेदना झाल्याचं पीडित व्यक्तीने सांगितले आहे.या अघोरी प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादूटोना प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाप लेकासह जादू टोना करणाऱ्या भोंदूबाबाचा देखील समावेश आहे.
पिंपरीत अखेर ‘त्या’ कुख्यात गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; तब्बल 700 हून अधिक CCTV तपासले अन्…