वेळीच सावध व्हा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक
मुंबई : क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना देणाऱ्या कंपनीने आज ग्राहकांना व व्यवसायांना मोठा सल्ला दिला की, दिवाळी सणादरम्यान केल्या जाणाऱ्या खरेदीवर लक्ष्य करत अत्याधुनिक सायबर फसवणूकीमध्ये वाढ होत आहे. भारतातील सर्वात मोठी मालवेअर विश्लेषण सुविधा सेक्यूराइट लॅब्समध्ये संशोधकांनी निदर्शनास आणले आहे की, सायबर गुन्हेगार अत्यंत वैयक्तिकृत व संदर्भीय हल्ले करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स-समर्थित साधनांचा वापर करत आहेत.
उद्योग डेटामधून निदर्शनास येते की, दिवाळी २०२४ दरम्यान ई-कॉमर्स विक्रीने ९०,००० कोटी रूपयांचा टप्पा पार केला, तसेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने पीक सीझनदरम्यान दररोज १३ लाखांहून अधिक बुकिंग्जची हाताळणी केली. डिजिटल व्यवहारांमधील या मोठ्या वाढीमुळे सेक्यूराइट लॅब्समध्ये संशोधकांनी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यासाठी ही स्थिती ‘परिपूर्ण वादळ’ असल्याचे वर्णन केले आहे. नुकतेच, उत्सवादरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर लक्ष्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या तोतयागिरी संदेशांमध्ये वाढ झाली आहे, ज्यापैकी अनेक संदेश कृत्रिम निकड निर्माण करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना योग्य पडताळणीशिवाय फसवणूक करणाऱ्या लिंक्सवर क्लिक करण्यास भाग पाडण्यासाठी तयार केले गेले आहेत.
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या उत्पादन धोरणाच्या प्रमुख स्नेहा काटकर म्हणाल्या, ”जेनएआयसह फसवणूक करणाऱ्यांना सानुकूल आणि स्वाभाविकत: अत्यंत संदर्भीय संवाद निर्माण करणे अत्यंत सोपे झाले आहे. उत्सवादरम्यान ‘आकर्षक डिल्स’सह खरेदीमध्ये वाढ होते, पण सर्वात लक्षवेधक संदेश देखील फसवे असू शकतात. फसवणूक करणारे हॉलिडे एफओएमओचा आधार घेऊन फसवणूक करतात, खाते अकार्यान्वित होण्याची धमकी देतात, काही संकेतांचा वापर करतात, जे खरे व्यापारी साजरीकरणादरम्यान क्वचितच वापरतात.”
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडने विशेषत: उत्सवादरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करणाऱ्या पाच प्रमुख हल्ला पद्धतींना ओळखले असून यात बनावट प्रवास आणि बुकिंग पोर्टल, फसवे ई-कॉमर्स आणि खरेदी घोटाळे, कार्यक्रम आणि मनोरंजन फसवणूक, क्यूआर कोड आणि यूपीआय पेमेंट ट्रॅप, एआय-एनहान्स्ड सोशल इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या विश्लेषणामधून निदर्शनास आले आहे की, सायबर गुन्हेगार त्यांच्या सोशल इंजिनिअरिंग हल्ल्यांना वाढवण्यासाठी मागील उल्लंघनांमधून डेटाचा वापर वाढवत आहेत. मोठ्या प्रमाणात डेटा चोरीमुळे लाखो ग्राहकांच्या नोंदी, तसेच आधार व पासपोर्ट माहिती उघडकीस येत आहे, ज्यामुळे गुन्हेगारांना ग्राहकांचे वास्तविक वैयक्तिक तपशील मिळतात. परिणामत: उत्सवी मोहिमांदरम्यान फसवणूक करणे अधिक सोपे होते.
सेक्यूराइट लॅब्समधील संशोधकांनी ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यांमधील काही ट्रेंड देखील ओळखले आहेत, जेथे गुन्हेगार विश्वासार्ह अधिकाऱ्यांकडून येणारे फोन कॉल, ईमेल किंवा व्हिडिओ संदेशांद्वारे संपर्क सुरू करतात. हे अत्याधुनिक सोशल इंजिनिअरिंग हल्ले मागील डेटा उल्लंघनांमधून मिळालेल्या अचूक वैयक्तिक माहितीचा संदर्भ देत ड्रग्ज तस्करी किंवा मनी लाँडरिंगसारखे खोटे आरोप करतात.
अशा स्थितीमुळे क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड शिफारस करते की, ग्राहकांनी सर्व डिवाईस अपडेट करावेत, अनपेक्षित लिंक्सवर क्लिक करणे टाळावे, यूपीआय ट्रान्सफर अधिकृत करण्यापूर्वी पेमेंट लाभार्थ्यांची पडताळणी करावी आणि सायबरक्राईमडॉटजी ओव्हीडॉटइनवर संशयास्पद क्रियाकलापांची त्वरित तक्रार करावी. कंपनीचे भारतातील पहिले एआय-संचालित फसवणूक प्रतिबंधक सोल्यूशन अँटिफ्रॉडडॉटएआय या उदयास येत असलेल्या धोक्यांना दूर करण्यासाठी रिअल-टाइम फिशिंग डिटेक्शन, स्कॅम-कॉल अलर्ट आणि डार्क-वेब मॉनिटरिंग प्रदान करते.
भारतात सणासुदीच्या काळात एआय-समर्थित सायबर गुन्ह्यांमध्ये वाढीमुळे डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व अधिक वाढले आहे. सणांदरम्यान ऑनलाइन क्रियाकलापांमध्ये वाढ होत असताना क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड आवाहन करते की ग्राहकांचे व व्यवसायांचे वाढत्या अत्याधुनिक धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान सोल्यूशन्स आणि वर्तणूकीबाबत जागरूकता दोन्ही आवश्यक असतील.