crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने सासरकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना पैठण तालुक्यातील नांदर गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Mumbai ED Raids : मुंबईत 8 ठिकाणी ईडीकडून छापेमारी, तर देशभरात 15 ठिकाणी छापेमारी; नेमकं कारण काय?
नेमकं काय घडल?
आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव राधा संतोष शेळके असे आहे. ती सुंदरवाडी झाल्टा येथील रहिवासी होती. राधाचा काही वर्षांपूर्वी संतोष शेळके यांच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सुरुवातीला सासरकडचे मंडळी चांगले वागत होते. मात्र काही दिवसांनंतर घर बांधण्यासाठी वडिलांकडून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. वडिलांची आर्थिक परिस्थती हलाकीची असल्याने पैसे देणे शक्य नसल्याचे राधाने सांगितले. त्यानंतर सासू, दीर, ननंद, जाऊ यांचा सतत छळ सुरु झाला. याच सततच्या त्रासाला कंटाळून राधाने अखेर टोकाचा निर्णय घेत शेतातील तलावात उडी घेतली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अशी, माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
या घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात मोठा जमाव केला. आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. आरोपींना अटक न झाल्यास शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शवविच्छेदन पार पडले. परिस्थती पाहता पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आठवडे बाजारात पोलिसांची धडक कारवाई; बंगळुरूसाठी निघालेल्या गांजा तस्कराला अटक
शहानूर मिया दर्गा चौकातील आठवडे बाजाराच्या मैदानात गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. जवाहरनगर पोलिसांनी २ लाख १० हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा तो बंगळुरूला विकण्यासाठी घेऊन जात होता. ट्रॅव्हल्समध्ये बसण्याआधीच पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. ही कारवाई रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव इरफान पाशा आरीफ पाशा (वय ४२, रा. भंगी कॉलनी, पेन्शन मोहल्ला, दक्षिण बंगळुरू, राज्य कर्नाटक) असे आहे.
Nashik Crime News: नाशिकचं बिहार होतंय का? एकाच दिवशी तीन खून; मुलानेच केली आईची निर्घृण हत्या