मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800
गोंदिया : अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत पहिलीत शिकणाऱ्या दोन मुलींना आठवीच्या विद्यार्थिनींनी बेदम मारहाण केली. त्याची माहिती महिला अधीक्षकांकडे दिली. मात्र, असा प्रकार होतच असतो, असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष केले. तर संस्था आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही. तर त्या जखमी विद्यार्थिनींवर 24 तास लोटूनदेखील उपचार करण्यात आला नाही. परिणामी, या सर्व प्रकाराची तक्रार वर्गशिक्षिकेने आदिवासी विभागाचे आयुक्तांकडे केली.
देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत केशोरी येथे श्री समर्थ अनुदानित आश्रमशाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिलीला आर. जी. गुट्टे शिकवितात. शाळेत सुट्टी झाल्यानंतर त्या घरी गेल्या. दरम्यान, इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने पहिलीतील लक्ष्मी सोनसाय मरोटे आणि राधिका नत्थू नरोटे यांना मारहाण केली. नंतर त्या विद्यार्थिनींनी वर्गशिक्षिका गुट्टे यांना हा प्रकार सांगितला. मारहाण झाल्यानंतर त्या विद्यार्थिनींनी याची तक्रार महिला अधीक्षकाकडे केली. परंतु, त्यांनी त्या जखमी विद्यार्थिनींवर उपचार केला नाही.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर शिक्षिका गुट्टे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी हा प्रकार मुख्याध्यापक मनोज कापगते आणि प्राचार्य रामकृष्ण लंजे यांना सांगितला. मात्र, दोघांनी असे प्रकार होत असतात, असे म्हणत वेळ मारून नेली. मात्र शिक्षिकेने प्रकल्प कार्यालयाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवर प्रकल्प कार्यालयाने चौकशी न करता संस्थाध्यक्षांना चौकशी करण्यास सांगितले.
तुमच्या स्तरावर प्रकरण निपटवा
‘तुमच्या स्तरावर प्रकरण निपटवा’, असे संस्थाचालकाला सांगण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून महिला अधिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षिका आर. जी. गुट्टे यांनी केली. त्यासंदर्भात त्यांनी अप्पर आदिवासी आयुक्त नागपूर, आदिवासी आयुक्त नाशिक आणि शिक्षक संघटनेकडे केली. यावर आता काय कारवाई करण्यात येते, याकडे लक्ष लागले आहे.