crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सायखेडामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्वाचे दस्तावेज जाळल्याचे प्रकार उघडकीस आले. विशेष तर ही बाब म्हणजे दुसऱ्यादिवशी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. हा प्रकार भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, यासाठी करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करण्याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायखेडा ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी गटविकास अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी केल्या होत्या. परंतु, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. या प्रकरणी चौकशी करून आरोपीला अटक करावी,अशी मागणी होत आहे. दरम्यान पांढरकवडा पोलीस ठाण्याचे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. ही दस्ताऐवज कोणी जाळले आणि का केले असल्याचा तपास पोलीस करीत आहे.
शालेय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार; गर्भवती होताच पालकांना धक्काच बसला अन् नंतर थेट…
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे शहर पोलिसांच्या हद्दीत मोडणाऱ्या गावात अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याच अत्याचारातून पीडित मुलगी 6 महिन्यांची गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी विधीसंघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचार, विनयभंग, छेडछाड अशा अनेक घटना वाढल्या आहेत. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गेल्या वर्षभरापासून आरोपीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली होती. या कालावधीत अल्पवयीन मुलाने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
अखेर त्यातून पीडिता गरोदर राहिली. शरीरात जाणवलेले बदल आणि वैद्यकीय अस्वस्थता आईच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला.