Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित दांपत्याचा करुण अंत झाला. 22 वर्षीय पतीने 18 वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. चुलत नाते आणि लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 03, 2026 | 10:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यांत नवविवाहित दांपत्याचा दुर्दैवी अंत.
  • पतीने पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज.
  • लग्नाला कुटुंबीयांचा विरोध आणि कौटुंबिक दबावाच्या आरोपांचीही चौकशी सुरू.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भाऊ बहिणीचं एकमेकांवर जडलं प्रेम, घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केलं, मात्र अवघ्या तीन महिन्यात नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली, नंतर स्वतःही आत्महत्या केली. असं काय नेमकं घडलं या तीन महिन्यात की थेट हत्या आणि आत्महत्या करावी लागली. चला जाणून घेऊया?

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सौरव सविता उर्फ टोनी (२२ वर्ष) असे आहे. ते हत्या झालेल्या तरुणीचे नाव राणी उर्फ शालिनी (१८ वर्ष) असे आहे. मृत सौरव आणि राणी हे दोघेही सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला का पुरवा गावचे रहिवासी होते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र नात्याने ते चुलत बहीण-भाऊ लागत असल्याने कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. कुटुंबीयांचा विरोध झुगारून सुमारे तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घराबाहेर पडून कोर्ट मॅरेज केले होते. लग्नानंतर दोघे काही दिवस दिल्लीत राहत होते. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच ते कानपूरला परतले आणि एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भाड्याने खोली घेऊन राहू लागले होते.

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

मंगळवारी (28 जुलै) दुपारी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला व्हेंटिलेटरमधून (रोशनदान) तरुण पंख्याला लटकलेला दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना राणीचा जमिनीवर मृतदेह आढळून आला आणि सौरवच मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:चे आयुष्य संपवले असे दिसून येत आहे, परंतु मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

तरुणीची आई आणि घरमालकाने काय सांगितलं?

या घटनेबाबत राणीच्या आईने सांगितले की, घटनेच्या काही वेळ आधीच त्यांचे मुलगी आणि जावयाशी बोलणे झाले होते, तेव्हा कोणत्याही वादाचा संशय आला नव्हता. कोर्ट मॅरेज झाल्यानंतरही सौरवचे कुटुंब राणीचा स्वीकार करत नव्हते आणि दोघांवर वेगळे होण्यासाठी सतत दबाव आणला जात होता, असा आरोप राणीच्या आईने केला आहे. तर घरमालकाला या दांपत्याबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. पोलीस सध्या दुचाकीच्या क्रमांकावरून नातेवाईकांशी संपर्क साधून सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बर्रा परिसरात.

  • Que: पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय समोर आले?

    Ans: पतीने आधी पत्नीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.

  • Que: या दांपत्याच्या लग्नाला विरोध का होता?

    Ans: दोघे चुलत भाऊ-बहिण नात्याचे असल्याने कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता.

Web Title: Uttar pradesh crime being cousins they got married despite family opposition the newlywed couple met a tragic end in just three months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
1

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर
2

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

Pune Crime: घरात सापडले तिघेही बेशुद्ध… दार उघडल्यानंतर समोर आलं हृदयद्रावक दृश्य! ऑनलाईन मागवलं ‘सोडियम नायट्रेट’ आणि…
3

Pune Crime: घरात सापडले तिघेही बेशुद्ध… दार उघडल्यानंतर समोर आलं हृदयद्रावक दृश्य! ऑनलाईन मागवलं ‘सोडियम नायट्रेट’ आणि…

UttarPradesh Crime: ‘या 6 महिन्यांच्या बाळाचं काय करायचं?’…पुढच्या काही मिनिटांत घडलं असं, की पोलिसही हादरले!
4

UttarPradesh Crime: ‘या 6 महिन्यांच्या बाळाचं काय करायचं?’…पुढच्या काही मिनिटांत घडलं असं, की पोलिसही हादरले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.