
crime (फोटो सौजन्य: social media)
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथील श्रावस्ती जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद परिस्थिती मृत्यू झाला आहे. पतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला तर पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह खाटेवर पडलेले आढळले. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक, फॉरेन्सिक टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे.
डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा; तब्बल दोन कोटींची केली फसवणूक
मृतदेह आढळल्या व्यक्तींचे नावे रोज अली (३२) असे पतीचे नाव आहे तर त्यांच्या पत्नीचे शहनाज (३०) असे नाव आहे. मुली तबस्सुम (६), गुलनाज (४) आणि मुलगा मुईन अली (१.५ वर्ष) असे मुलांचे नाव आहे. कैलाशपूर बनकट ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या लियाकत पूर्वा गावात शुक्रवारी हे प्रकरण समोर आले. गेल्या दीड वर्षांपासून रोज अली मुंबईत मजूर म्हणून काम करत होता.
संध्याकाळी वाद झाला होता…
श्रावस्ती लियाकत पूर्वा येथील रहिवासी रोज अली गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत मजूर म्हणून काम करत होता. कार्तिक पौर्णिमेच्या मेळ्यासाठी तो घरी परतला. त्याला आणखी सहा भाऊ आहेत, त्यापैकी एक भाऊ त्याच्या कुटुंबासह मुंबईत मजूर म्हणून काम करतो. उर्वरित पाच भाऊ अजूनही लहान आहेत आणि त्यांच्या आईसोबत घरी राहतात. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी पती-पत्नीत वाद झाला. पण वाद इतकही मोठा झालेला न्हवता. शुक्रवारी सकाळी बराच वेळ दार उघडले नाही तेव्हा आई जैतुना यांनी दार ठोठावले. तरीही कोणतीही हालचाल झाली नाही. त्यांची खोली आतून बंद होती, त्यामुळे घटनेची परिस्थिती अधिकच संशयास्पद बनली आहे. कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह बेडवर पडलेले आढळले. पाच जणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एएसपी मुकेश चंद्र उत्तम यांनीही घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.