Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: मेरठमध्ये धक्कादायक प्रकार! 4 महिने मुलीच्या मृतदेहासोबत वडील घरातच राहिले, नंतर…

मेरठमध्ये 34 वर्षीय तरुणीचा कुजलेला मृतदेह चार महिन्यांनंतर घरात आढळला. वडील काही दिवस मृतदेहासोबत राहून घराला कुलूप लावून फरार झाले. नंतर त्यांनीच सत्य उघड केल्याने खळबळ उडाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2026 | 02:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 4 महिन्यांनंतर घरात कुजलेला मृतदेह सापडला
  • वडील मृतदेहासोबत राहून नंतर फरार
  • पोलिस तपास सुरू, वडील ताब्यात
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बंद घरामध्ये तब्ब्ल चार महिन्यानंतर एका ३४ वर्षीय तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीच्या मृत्यूनंतर तिचे वडील त्याच मृतदेहासोबत घरात राहिले आणि त्यांनतर घराला कुलूप लावून फरार झाले. ही घटना उत्तरप्रदेश येथील मेरठमध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

मृत तरुणीचे नाव प्रियांका होते. ती उच्चशिक्षित होती. तिचे वडील उदय भान बिस्वास हे शिक्षण विभागातून निवृत्त झाले असून मूळचे बंगालचे रहिवासी आहेत. प्रियांकाचा मृत्यू डिसेंबर २०२५ मध्ये आजारपणामुळे झाला होता. गेल्या चार महिन्यांपासून वडील आणि मुलगी दोघांचाही काहीच पत्ता लागत नव्हता. वारंवार फोन करूनही संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत होते. त्यांनी आजूबाजूलाही चौकशी केली, पण काहीच माहिती मिळाली नाही.

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी ईडीचे 11 ठिकाणी छापेमारी, तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी

शुक्रवारी तरुणीचे वडील मेरठमधील बेगम बाग भागातील एका चहाच्या टपरीवर बसलेले आढळले. त्यांचा पुतण्या विश्वजितने त्यांना ओळखले आणि इतर नातेवाईकांना बोलावून घेतले. जेव्हा वडिलांना मुलीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी ती डेहराडूनमधील एका रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले. मात्र नातेवाईकांना त्यांच्या बोलण्यावर संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली. त्यांनतर वडिलांनी जे सत्य सांगितले ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

धक्कादायक माहिती समोर

त्यांनी कबूल केले की मुलीचा मृत्यू चार ते पाच महिन्यांपूर्वीच झाला असून तिचा मृतदेह घरातच पडलेला आहे. त्याने तातडीने ११२ क्रमांकावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला असता, तरुणीचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह बेडवर पडलेला दिसला. घरामध्ये कचरा आणि रद्दीचा खच पडला होता आणि मृतदेहाचा तीव्र दुर्गंध येत होता.

पोलिसांनी काय सांगितले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीत काही परफ्युम स्प्रे देखील सापडले आहेत, ज्यावरून दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा आलेला नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

कारण काय?

वडिलांनी सुरुवातीला सांगितले होते की, मुलीला कावीळ झाली होती आणि तिच्यावर जादूटोणा व तंत्र-मंत्राद्वारे उपचार केले जात होते, ज्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या निधनामुळे प्रचंड दुःखात असल्याने आपण घर सोडून निघून गेलो, असा दावा वडिलांनी केला.

Beed Crime: नात्याला काळिमा! आई माहेरी गेली आणि घडलं भयंकर; नराधम सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह किती दिवसांनी सापडला?

    Ans: सुमारे चार महिन्यांनंतर सापडला.

  • Que: वडिलांनी काय केले होते?

    Ans: काही दिवस मृतदेहासोबत राहून घर बंद करून फरार झाले.

  • Que: प्रकरण उघड कसे झाले?

    Ans: नातेवाईकांच्या संशयामुळे वडिलांनी सत्य कबूल केले.

Web Title: Uttar pradesh crime shocking incident in meerut father lived with daughters body inside the house for 4 monthsthen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.