crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
उत्तर प्रदेश येथून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने आपलं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा फिल्मी षडयंत्र आखल्याचे समोर आले आहे. या तरुणीने आपल्या चेहऱ्यावर सॉस लावून रक्ताचे डाग असल्याचे भासवत धमकीचे फोटो आणि मेसेज पाठवले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांमध्ये एकाच खळबळ उडाली होती. तिने हे सर्व केवळ ठरलेलं लग्न मोडावं या उद्देशाने केलं होत. परंतु पोलिसांनी जेव्हा या मुलीचा शोध घेता तेव्हा अनेक धक्कदायक बाब समोर आल्या आहेत. नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
उत्तरप्रदेश येथील गोंडा जिल्ह्यातल्या एका तरुणीचे लग्न ठरले होते. मात्र तिला हे लग्न मान्य नव्हते. तिला हे लग्न करायचे नव्हते. त्यामुळे तिने २५ सप्टेंबर रोजी शाळेत जाण्याचे निमित्त करून घरातून बाहेर पडली. तिने थेट लखनऊची गाडी पकडली आणि तिथे पोहोचली. तेथे तिने लग्नापासून वाचण्यासाठी फिल्मी स्टाइलमध्ये अपहरणाचा कट रचला. तिने अगोदरच चेहऱ्यावर सॉस लावून बनावट जखमांचे फोटो काढले होते. प्रवासात असताना तिने ते फोटो आणि धमक्यांनी भरलेले मेसेज होणाऱ्या सासऱ्यांना पाठवले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली.
तिने फोटो सहित धमकीचे मेसेज देखील पाठवले होते. त्या मेसेजमध्ये तिने लिहिले होते ‘आता माझा सूड पूर्ण झाला आहे. 20 वर्षांपूर्वीच्या शत्रुत्वाचा बदला घेतला आहे,’ असे लिहिले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एसपी विनीत जयस्वाल यांनी पोलिसांची ५ पथके तपासासाठी नेमली. पोलिसांनी तातडीने तपास करून तरुणीला करनैलगंज येथून सुखरूप ताब्यात घेतले. तिची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने हे कट स्वतः रचल्याचे सांगितले. तिला हे लग्न करायचे नव्हते. हे लग्न तिच्या मर्जीचा विरुद्ध होत होते. त्यामुळेच ही खोटी योजना आखल्याची कबुली दिली. सततच्या कौटुंबिक दबावातून तिने हा मार्ग निवडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीडितेच्या आईने सांगितले की सुरुवातीपासूनच काहीतरी गडबड असल्याचा संशय होता. त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी गुणपत्रिका जमा करण्यासाठी काही पैसे आणि पुस्तके घेऊन गेली होती. परंतु त्यानंतर ती गायब झाली. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर स्पष्ट झाले की, या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही बाहेरील टोळीचा हात नव्हता. लग्नाचा दबाव टाळण्यासाठी तरुणीनेच हे स्व-रचित षड्यंत्र रचले होते. गोंडा पोलिसांनी तरुणीला यशस्वीरित्या ताब्यात घेतले असून, तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…