गोंडामध्ये प्रेयसीने केली प्रियकराची हत्या
गोंडा : उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमिकानेच तिच्या प्रियकराची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली. ओढणीने गळा आवळून तिने प्रियकराचा जीव घेतला. या प्रकारामुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ झाली आहे. 17 ऑगस्टच्या संध्याकाळी गोंडा जिल्ह्यातील पोलिसांना पिटगाव करुवापाराजवळील तलावामध्ये मृतदेह आढळला. पोत्यात बांधलेल्या हा अज्ञात मृतदेहाबाबत पोलिसांनी तातडीने ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु केले. अवघ्या तीन दिवसांमध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
गोंडामध्ये झालेल्या हत्येच्या उलघडा करताना पोलिसांना हे प्रकरण विवाहबाह्य संबंधाशी निगडीत असल्याचे आढळले. पाण्यामध्ये मृतदेह आढळलेल्या व्यक्तीच्या त्याच्याच मुलगी शहनाजने हरवल्याची तक्रार दाखल केली होती. 48 वर्षीय कलिमुद्दीन हत्या प्रकरणाचा खुलासा करताना गर्लफ्रेंड शरीफुनिशाला अटक करण्यात आली आहे. इटियाठोक पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. या तपासावेळी मृत कलीमोद्दीन आणि आरोपी प्रेयसी शरीफुन्निशा या दोघांचे गेल्या दीड वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले.
टॉवेलने हात बांधत ओढणीने दाबला गळा
15 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास कलीमुद्दीन प्रेयसी शरीफुनीषा हिच्या घरी गेला. त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाले. यावेळी आरोपी शरीफुन्निशाने प्रियकर कलीमुद्दीन याला विश्वासात घेऊन चेष्टेने त्याचे दोन्ही हात टॉवेलने बांधले आणि ओढणीने त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पोत्यामध्ये गुंडाळून घराजवळील भगतीनिया तलावात फेकून दिले.
खूनाचे कारण काय?
कलीमुद्दीन हा अनेकदा शरीफुन्निशा हिच्या घरी जायचा. तसेच तिला लागणारे घरातील वस्तू व सामान खरेदी करून देत असे. कलीमुद्दीनने प्रेयसी शरीफुन्निशा हिला 10 हजार रुपयेही दिले होते. मात्र शरीफुन्निशा दुसऱ्या तरुणासोबत गप्पा मारत असल्याने कलीमुद्दीनला तिच्यावर संशय आला. यानंतर कलीमुद्दीन याने तिच्या त्याचे पैसे परत मागायला सुरुवात केली. यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद देखील झाले. या वादातून प्रेयसीने प्रियकराचा खून केला. पोलिसांनी आरोपी प्रेयसी शरीफुन्निशा हिला अटक करून केली असून पुढील तपास सुरु आहे.