
crime (फोटो सौजन्य: social media)
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशच्या झासी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत एक तरुण आढळला. संबंधित तरुणाला त्या अवस्थेत पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. तो सतत “माझ्या पत्नीला बोलवा, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत”. असे आसपासच्या लोकांना सांगू लागला. तिथल्या लोकांनी तुरट तरुणाचं बोलणं ऐकलं आणि त्याची गंभीर अवस्था पाहून स्थानिक रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
काय सांगितले पोलिसांना?
या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे अधिकारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून पोलिसांना एक तरुण गंभीरीरत्या जखमी अवस्थेत आढळला. अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाची चौकशी करण्यास सुरुवात केली. जखमी तरुणाने आपलं नाव विष्णू उर्फ मजनू असल्याचं सांगितलं आणि तो औरेया येथील रहिवासी असल्याचं देखील त्याने सांगितलं. त्यावेळी देखील सतत तो आपल्या पत्नीबाबत बोलत होता. तो म्हणत होता की एक तरुण त्याच्या पत्नीला आपल्यासोबत घेऊन गेला आहे आणि त्याच तरुणासोबत मारहाण सुरु आहे. त्या तरुणाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला असल्याचे विष्णूने पोलिसांना सांगितले.
आधीही आरपीएफने स्टेशनच्या बाहेर काढलं होतं
रेल्वे स्टेशनच्याअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण दारूच्या नशेत होता आणि त्याला यापूर्वी सुद्धा आरपीएफने स्टेशनच्या बाहेर काढलं होतं. मात्र तरीसुद्धा तो पुन्हा स्टेशनवर आला त्यावेळी, तो तरुण जखमी अवस्थेत असल्याचे रेल्वे पोलिसांनी पाहिले. त्याच्या मानेवरून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. विष्णूने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, तो औरेया येथे राहत असून त्याची पत्नी भोपालची रहिवासी आहे. आता, पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला असून जखमी तरुणावर झांसीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
Solapur Crime: धक्कादायक! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण; व्हिडिओ व्हायरल
Ans: मोंठ
Ans: विष्णू
Ans: मेडिकल