मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एका चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाले होते. या चिमकलीचा शोध लावण्यात एमआरए मार्ग पोलिसांना अखेर यश मिळालं आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील एका अनाथ आश्रमात पोलिसांना ही मुलगी सापडली असून तिला सुखरूप तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
२० मे २०२५ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एका चिमुकलीचे अपहरण करण्यात आल होते. वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरवरून मुंबईला आलेले कुटुंब छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असताना अचानक त्यांच्या मुलीच अपहरण झाल होते. दरम्यान, अपहरणकर्त्याने चिमुकलीला आमिष दाखवलं आणि लोकलने तिला घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनसवर नेलं आणि तिथून पुढे भुसावळ, मध्यप्रदेश असा प्रवास करत थेट उत्तर प्रदेशला घेऊन गेला.
Solapur Crime: धक्कादायक! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण; व्हिडिओ व्हायरल
कसा केला तपास?
सुरवातीला पोलिसांनी चिमुकलीला शोधण्याचे खूप प्रयत्न केले. पोलिसांच्या सात टीमने उत्तर प्रदेशात कसून शोध घेतला. मात्र चिमुकली काही मिळून आली नाही. त्यानंतर काही महिन्यांत पुन्हा पोलिसांची पथक उत्तर प्रदेशला पाठवण्यात आली होती. मात्र त्यावेळी देखील पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन शोध” अंतर्गत पुन्हा एकदा पोलीस पथक उत्तर प्रदेशला पाठवण्यात आलं. यावेळी देखील पोलिसांनी स्थानिक पोलीस आणि जीआरपीची मदत घेतली आणि रेल्वे स्थानक तसेच वाराणसी जवळील गर्दीच्या ठिकाणी चिमुकलीचे फोटो लावले.
पत्रकाराने दिली माहिती
दरम्यान, फोटो बघून एका पत्रकाराने पोलिसांना अनाथाश्रमातील मराठी बोलणाऱ्या एका चमुकलविषयी सांगितलं. माहितीमिळताच तत्काळ पोलिसांच पथक अनाथाश्रमात गेलं. चिमुकलीचा फोटो तिच्या आईवडिलांना पाठवला आणि त्यांनी क्षणात आपल्या पोटच्या पोरीला ओळखलं. उत्तरप्रदेशची काशी येथे पोलिसांना ही चिमुकली सापडली होती. म्हणून आश्रमात तीला काश्वी नाव ठेवण्यात आल होते. आश्रमाने तीचं आधार कार्ड बनवून तिला शाळेत देखील घातल होत. पोलीस या चिमुकलीला घेऊन मुंबईला आले आणि तिला तिच्या आई वडिलांच्या हाथी सोपवलं. आई वडिलांनी देखील आपल्या पोटच्या पोरीला सुखरूप परत आल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.
सायबर चोरट्यांनी आता लढवली ‘ही’ नवी शक्कल; APK फाईल पाठवतात अन् एक क्लिक करताच…
Ans: CSMT
Ans: वाराणसी
Ans: ऑपरेशन






