Vadgaon Maval Mephedrone MD drug seller arrested by police with goods worth one lakh
वडगाव मावळ : वडगाव मावळमध्ये गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मावळ तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. हीच बाब पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत पोलीस यावर चक बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच उर्से गावच्या हद्दीत सव्वा लाख रुपयांचे मेफेड्राॅन (एम. डी) ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि ११ ) रोजी दुपारच्या सुमारास फिनोलेक्स कंपनीसमोरील ब्रिजजवळ करण्यात आली आहे. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
समेश राजू तिकोणे (वय. २१.राहणार. कान्हे फाटा ता.मावळ जि.पुणे ) असे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगीलवाड यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
मावळ तालुक्यातील उर्से गावच्या हद्दीत असणाऱ्या फिनोलेक्स केबल कंपनीसमोर एक तरुण मेफेड्राॅन (एम. डी) हा अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे दि ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पोलिसांनी कारवाई करत तरुणाला रंगेहाथ पकडून त्याच्या जवळील ११.७५० ग्रॅम मेफेड्राॅन (एम. डी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सदर कारवाईमध्ये आरोपींकडून १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
महिला पोलिसांसोबत गैरवर्तन
तासगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तासगावच्या मध्यवर्ती बसस्थानक चौकात दुपारची गर्दी… वाहनांचा कलकलाट, हॉर्नचा आवाज, आणि उन्हाच्या तडाख्यात उभ्या असलेल्या महिला वाहतूक पोलिस नेहमीप्रमाणे वाहतुकीची शिस्त राखण्याचा प्रयत्न करत होत्या. पण याच वेळी, एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या तरुणाने भर चौकात गोंधळ घातला. महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जत तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल दिपाली उत्तम खरात या सोमवारी 12.30 वाजताच्या दरम्यान बसस्थानक चौकात आपले कर्तव्य बजावत होत्या. त्याचवेळी अमोल विष्णु काळे (वय 30, रा. काशलींगवाडी, ता. जत, जि. सांगली) हा MH-05-AJ-9977 क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारसह आला. यावेळी खरात यांनी काळे याची गाडी थांबवली. मात्र गाडी का थांबवली असे म्हणत काळे याने खरात यांच्याशी गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणत, लोकांसमोर पोलिसांबद्दल चुकीचा संदेश जाईल, असे वक्तव्य केले.