Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varsova Crime : वर्सोव्यात आढळला पोत्यात बांधलेला तरुणाचा मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?

Varsova Crime : वर्सोवा येथील समुद्र किनारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवले आहे. सदर व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 01, 2026 | 09:27 PM
Varsova Crime : वर्सोव्यात आढळला पोत्यात बांधलेला तरुणाचा मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?

Varsova Crime : वर्सोव्यात आढळला पोत्यात बांधलेला तरुणाचा मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?

Follow Us
Follow Us:
  • फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना आढळले पोते
  • शवविच्छेदनासाठी मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवला
  • पुरावा नष्ट करण्याचा हेतूचा संशय
 

मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा समुद्रकिनारी (Varsova Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह सापडल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा अंदाज प्राथमिक दर्शनी व्यक्त करण्यात येत आहे. देवाची वाडी, जेपी रोड येथील हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूस गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याची माहिती समोर येत आहे.

नागरिकांना आढळले पोते

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे असून, मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळला आहे. समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना पोत्यात काहीतरी बांधलेले वाहून आल्याचे दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. लगेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ब्लेडच्या साह्याने पोते उघडले असता त्यामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळला. या नंतर पोलिसांनी मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?

अज्ञात व्यक्तीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून समुद्रात फेकल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) आणि 238 अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वर्सोवा पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. सुरुवातीला पोलिसांसमोर तरुणाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान असेल. त्याची ओळख पटल्यानंतरच पुढील तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

दरम्यान, गुरुवारी रायगड येथेही एक दुःखद घटना घडली. पुण्यावरून आलेल्या सहलीतील 8 जणांचा येते बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल पर्यटनासाठी आली होती. या दुर्घटनेतील सर्व आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Web Title: Varsova crime beach young man body found on the beach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Andheri
  • Doctor
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Anti-Narcotics Cell : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई, 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक
1

Anti-Narcotics Cell : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई, 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.