Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kandivali Chain Snatching : डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला, पत्ता विचारण्याचा बहाणा अन् सोनसाखळी हिसकावली

Kandivali Chain Snatching : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 06, 2026 | 07:37 PM
Gold Chain Robbery ,Kandivali Chain Snatching

Gold Chain Robbery ,Kandivali Chain Snatching

Follow Us
Follow Us:
  • आरोपी डिलीवरी बॅायच्या वेशात येऊन पत्ता विचारत होता  
  • दर महिन्याला सरासरी 25-30 सोनसाखळी चोरीच्या घटना  
  • याआधी कांदिवली मध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या  
Kandivali Chain Snatching : पत्ता विचारण्याच्याबहाण्याने आला आणि एका चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरली. ही घटना कांदिवली पश्चिम परिसरात घडली असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे. सोसायटीतल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. जवळ गेल्या नंतर त्याने तिची सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि तो तेथून पळून गेला.

 

ही संपूर्ण थरारक घटना 3 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 9.23 वाजता सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेता व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आरोपी डिलीवरी बॅायच्या वेशात येऊन पत्ता विचारत होता

मिळालेल्या माहिती नुसार हा आरोपी डिलीवरी बॅायच्या वेशात येऊन पत्ता विचारत होता. पिढीत वृद्ध महिले बरोबर बोलता बोलता त्याने सोनसाखळी खेचून फरार झाला. सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून येते की, आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ जाऊन तिची सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि तो पळून गेला. या घटनेमुळे सोसायटीतील जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच इतर सुक्षिताना काय समजावे.

या आधीही सुद्धा दहिसर आणि बोरीवलीत अशाच पद्धतीने पत्ता विचारणे, लिफ्ट मागणे, किंवा मदत मागण्याच्या बहाण्याने जवळ येऊन चेन हिसकावण्याची घटना घडली होती.

Mumbai Chain Snatching: Elderly Woman Robbed in Kandivali A shocking incident has emerged from Kandivali West Mumbai, where an elderly woman was robbed inside her building corridor CCTV footage shows an unidentified suspect approaching the victim under the pretext of asking for an address, before allegedly snatching her gold chain and fleeing Local police are currently investigating the matter. — Ramesh Speaks (@rameshofficial0) November 6, 2026

दर महिन्याला सरासरी 25-30 सोनसाखळी चोरीच्या घटना

ऑगस्ट 2026 मध्ये कांदिवली पूर्व येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली होती. ती घटना देखील CCTV मध्ये कैद झाली होती. तसेच मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2025-26 मध्ये मुंबईत दर महिन्याला सरासरी 25-30 सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतात. यामध्ये कांदिवली, बोरिवली, मालाड या भागात चोरीचे सर्वात जास्त प्रमाण आहे.

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

याआधी कांदिवली मध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या

मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील घटनेचा मुंबई पोलीस तपास करत असून या घटने वरुन मुंबई असेल किंवा इतर सोसायटीतील माणसांनी आणि वृद्धांनी अधिक सर्तक राहणे गरजेचे आहे. याआधी सुद्धा कांदिवली मध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. ह्याच पॅटर्नचा वापर करुन सोनसाखळी चोरण्यात आली होती.

Gurugram Viral Video :  गुरुग्राममध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून चोरी, गुन्हेगाराने मोबाईल हिसकावून काढला पळ 

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरीची घटना कुठे घडली?

    Ans: कांदिवली पश्चिम परिसरातील एका सोसायटीत घडली.

  • Que: घटना कधी घडली?

    Ans: ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून २३ मिनिटांनी ही घटना घडली.

  • Que: सोनसाखळी कशी चोरली?

    Ans: आरोपी डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या जवळ जाऊन तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.

Web Title: Kandivali west delivery boy disguise gold chain snatching cctv sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Kandivali
  • Mumbai Police
  • Senior Citizens
  • viral video

संबंधित बातम्या

Gurugram Viral Video : गुरुग्राममध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून चोरी, गुन्हेगाराने मोबाईल हिसकावून काढला पळ
1

Gurugram Viral Video : गुरुग्राममध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून चोरी, गुन्हेगाराने मोबाईल हिसकावून काढला पळ

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत
2

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…
3

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral
4

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.