Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; आरोपी विशाल गवळीने संपवलं आयुष्य

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात पहाटे सुमारे साडेतीन वाजता आत्महत्या केली. तो त्या वेळी शौचालयात गेला होता

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 13, 2025 | 12:42 PM
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; आरोपी विशाल गवळीने संपवलं आयुष्य
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:   कल्याणमध्ये डिसेंबर 2024 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. पण शनिवारी (13 एप्रिल) त्याने तुरूंगातच गळफास घेत आत्महत्या केली. विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर गवळीचे वकील संजय धनके याने तरूंग प्रशासनावरच गंभीर आरोप केले आहेत. विशाल गवळीने आत्महत्या केली नसावी, त्याला मारले गेले असावे, विशाल गवळीचीही अक्षय शिंदेप्रमाणे हत्या केली गेली, असा आरोप संजय धनके यांनी केला आहे.

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात पहाटे सुमारे साडेतीन वाजता आत्महत्या केली. तो त्या वेळी शौचालयात गेला होता आणि तिथे टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं. या घटनेनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणी पीडित मुलीचे वकील नीरज कुमार बोलताना म्हणाले की, न्यायालयाच्या माध्यमातून विशाल गवळीला कठोर शिक्षा झाली पाहिजे होती. त्याला फाशी होण्यासाठी आमचे खूप प्रयत्न सुरू होते. पण त्याने आत्महत्या केली असली तरी आम्हाला एक प्रकारचा न्याय मिळाला आहे. त्याला फाशी झाली असती तर मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर दहशत राहिली असती. त्याने आत्महत्या केली असली तरी आम्हाला न्याय मिळाला, असे वाटते.

विशाल गवळी सराईत गुंड

विशाल गवळी हा कल्याणमध्ये सराईत गुंड होता. या प्रकरणापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण असे गुन्हे त्याच्यावर होते. त्याने तीन लग्न केली असून दोन बायकांनी सोडून दिल्यानंतर त्याने तिसरे लग्न केले होते. २३ डिसेंबर २०२४ रोजी कल्याणमधील कोळसेवाडी भागात राहणाऱ्या एका चिमुकल्या मुलीला फसवून त्याच्या घरी नेले आणि त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही तो दोन दिवस लपून राहिला, ओळख लपवण्यासाठी त्याने दाढीही काढली. पण अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले होते.

Web Title: Vishal gawli accused in the case of abusing minor girls in kalyan ends his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • kalyan crime news
  • Mumbai crime news

संबंधित बातम्या

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं; भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी
1

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं; भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी

Mumbai Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर पाच अल्पवयीनांनी केलं अत्याचार; पीडिताचे अश्लील व्हिडीओ चित्रित केलेले दाखवून ब्लॅकमेलिंग
2

Mumbai Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर पाच अल्पवयीनांनी केलं अत्याचार; पीडिताचे अश्लील व्हिडीओ चित्रित केलेले दाखवून ब्लॅकमेलिंग

Mumbai Crime News: तीन हजाराच्या कर्जापायी मुलगी ठरली ऑनलाईन मॉर्फिंगचा बळी
3

Mumbai Crime News: तीन हजाराच्या कर्जापायी मुलगी ठरली ऑनलाईन मॉर्फिंगचा बळी

Mumbai Crime News: लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घुसला, महिलांसोबत लज्जास्पद कृत्य; पोलिसांवर विश्वास ठेवायचा की नाही?
4

Mumbai Crime News: लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घुसला, महिलांसोबत लज्जास्पद कृत्य; पोलिसांवर विश्वास ठेवायचा की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.