
Mumbai Crime News: सहाव्या मजल्यावरून चिमुकल्याला फेकले; सीसीटीव्हीने उघड केला धक्कादायक प्रकार
मुंबई : गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरात १८ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील डक्टमधून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री शिवशाही इमारतीत ही घटना घडली. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये १० वर्षीय मुलगी बाळाला उचलून डक्टमध्ये फेकताना दिसत असल्याचे पोलिसांनी तपासात समोर आणले आहे.
गोरेगाव पूर्वेतील नागरिक निवारा परिसरातील शिवशाही प्रकल्पातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये १० वर्षीय मुलीने १८ महिन्यांच्या बाळाला उचलून डक्टमध्ये खाली फेकल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, बाळाला खाली फेकल्यानंतर संबंधित मुलगी इमारतीच्या परिसरात सायकल चालवत असल्याचेही सीसीटीव्हीत दिसत आहे.
हेही वाचा: कराडजवळ भीषण अपघात; दर्शन घेऊन परतले, पण घरी पोहोचलेच नाहीत,चौघांचा दुर्दैवी अंत
घटनेनंतर दिंडोशी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान १० वर्षीय मुलगी आणि तिच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आल्याचा आरोपही मृत बाळाच्या कुटुंबीयांनी केला आहे. जुन्या भांडणातून किंवा घर खाली करण्याच्या उद्देशाने हा कट रचला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आणि बाल कल्याण समितीच्या निर्देशांनुसार १० वर्षीय मुलीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, एवढ्या लहान मुलीने हे कृत्य नेमके कोणत्या कारणातून केले, तसेच त्यामागे अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.
Ans: गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरातील शिवशाही इमारतीत ही घटना घडली.
Ans: १० वर्षीय मुलीविरोधात BNS कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: मृत बाळ १८ महिन्यांचे होते.