
image
मुंबई : घाटकोपरमधील ६१ वर्षीय व्यावसायिकाला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देत तब्बल चार कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने कारवाई करत नाझिया मेहमूद शेख उर्फ नाझनीन या महिलेला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आणखी पाच लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना नाझिया पोलिसांच्या सापळ्यात रंगेहात अडकली.
पीडित व्यावसायिक कुर्ला येथील नातेवाइकाच्या दागिन्यांच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतात. २०२० मध्ये दागिने खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या माध्यमातून त्यांची नाझियाशी ओळख झाली होती. सुरुवातीला आर्थिक अडचणीचे कारण सांगून नाझियाने त्यांच्याकडून सुमारे १० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर नाझियाने व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल केला. या कॉलदरम्यान तिने अश्लील व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तिने प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली वेगवेगळी कारणे सांगून व्यावसायिकाकडून तब्बल चार कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या व्यावसायिकाने अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर गुन्हे शाखेने तपास सुरू करून नाझियाला पकडण्यासाठी सापळा रचला. नाझिया आणखी पाच लाख रुपयांची खंडणी स्वीकारण्यासाठी आली असता गुन्हे शाखेच्या पथकाने तिला रंगेहात पकडले. तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच उकळलेली रक्कम कुठे वळवण्यात आली, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
Ans: ही घटना मुंबईतील घाटकोपर परिसरातील आहे.
Ans: अश्लील व्हिडीओची धमकी देत सुमारे चार कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
Ans: आणखी पाच लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना गुन्हे शाखेने सापळा रचून तिला रंगेहात पकडले.