Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्णेकर हत्याकांडाचा कट कुठे शिजला? ‘पप्या’च्या कोठडीत वाढ, 19 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मुख्य संशयित पप्प्याने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने मोबाईल व सिमकार्ड विकत घेऊन ते टल्लीला दिल्याचे तपासात समोर आले आहे. पप्प्या पोलिसांची दिशाभूल करत असून, सहकार्य करत नसल्याने, त्याला इतर आरोपींसमोर बसवून चौकशी केली जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2026 | 01:39 PM
पूर्णेकर हत्याकांडाचा कट कुठे शिजला? 'पप्या'च्या कोठडीत वाढ, 19 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

पूर्णेकर हत्याकांडाचा कट कुठे शिजला? 'पप्या'च्या कोठडीत वाढ, 19 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Follow Us
Follow Us:
  • हत्याकांडात दोन पिस्तुल, तीन चॉपरचा वापर
  • प्रदीप पूर्णेकर यांच्या थरारक हत्याकांडाचा कट
  • अमितसिंग ऊर्फ पप्पूच असल्याचे निष्पन्न
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या थरारक हत्याकांडाचा कट नेमका कुठे आणि कसा शिजला? याचा छडा लावण्यासाठी ठाणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ ‘टल्ली’ आणि अमितसिंग ऊर्फ ‘पपलू’ या दोघांना न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे; तर मुख्य संशयित सुभाष शिंदे ऊर्फ ‘पप्प्या’ याच्या कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

हत्येच्या वेळी डोक्यात हेल्मेट घालून आलेला हल्लेखोर दुसरा तिसरा कोणी नसून अमितसिंग ऊर्फ पपलूच असल्याचे निष्पन्न झाले आहे, असा दावा पोलिसांनी न्यायालयात कोठडी मागताना केला. तसेच एफआयआरमध्ये नाव असलेल्या टल्लीचाही गुन्ह्यात थेट सहभाग समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू असून, हत्या प्रकरण्यापूर्वी आरोपींनी सराव कोठे केला? त्यांना इतरांची मदत होते का? याचा तपास होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हत्याकांडात दोन पिस्तुल, तीन चॉपरचा वापर

हत्याकांडात दोन पिस्तूल आणि तीन चॉपर वापरल्याचे स्पष्ट झाले असून, नितेश पवार ऊर्फ भावड्या याच्याकडून एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. उर्वरित पिस्तूल आणि तीन चॉपर अद्याप जप्त व्हायचे आहेत. ही शस्त्रे नेमकी कुठून आणली ? रसद कोणी पुरवली? आणि आर्थिक मदत कोणाची होती? याचा माग पोलिस घेत आहेत. हल्ल्याच्या वेळी आरोपींनी घातलेले कपडे, हेल्मेट आणि त्यांचे मोबाईल फोन जप्त करणे बाकी असून, दोघांच्या घरांची झडती आणि बँक खात्यांतील संशयास्पद व्यवहारांचीही तपासणी केली जाणार आहे.

बैठकीत नेमकी काय खलबते झाली?

गुन्ह्यानंतर एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मुख्य संशयित पप्प्याने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने मोबाईल व सिमकार्ड विकत घेऊन ते टल्लीला दिल्याचे तपासात समोर आले आहे. पप्प्या पोलिसांची दिशाभूल करत असून, सहकार्य करत नसल्याने, त्याला इतर आरोपींसमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. जयनाथ पूर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी अटक केलेले सर्व प्रमुख आरोपी ‘नीळकंठ ग्रीन्स’ येथे एकत्र जमले होते. या बैठकीत नेमकी काय खलबते झाली आणि हत्येचा कट याच बैठकीत शिजला का, यादृष्टीने तपास होणार आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा

Web Title: Where was the plot to assassinate purnekar hatched nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 01:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.