Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे सीईओ सुचना सेठ? जिने आपल्या चार वर्षांच्या मुलाची केली हत्या; खुनाचं कारण हादरवणारं!

पोलिसांनी महिलेची बॅग तपासली असता त्यात तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. पतीला भेटू नये म्हणून तिने आपल्या मुलाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 09, 2024 | 03:29 PM
कोण आहे सीईओ सुचना सेठ? जिने आपल्या चार वर्षांच्या मुलाची केली हत्या; खुनाचं कारण हादरवणारं!
Follow Us
Follow Us:

गोव्यात एका चार वर्षाच्या मुलाच्या हत्येच्या घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ(4 year boy killed by his mother in goa) उडाली आहे. या मुलाची हत्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तिनं केली नसून त्याच्या जन्मदात्या आईनं केली आहे. सुचना सेठ (uchana Seth) असं या महिलेचं नाव असुन अत्यंत निदर्यपणे तिनं तिच्या मुलाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. सध्या  गोवा पोलिसांनी तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक केली असून या प्रकरणी चौकशी केली जातेय.  मात्र, मुलाची हत्या करण्याचं कारण ऐकून तुम्हीही हादरुन जालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती तिच्या पतिसोबत घटस्फोट घेणार असून आपल्या मुलाला तिच्या पतीला भेटू नये म्हणून हे भयानक पाऊल उचलले आहे. स्वत:च्या पोटच्या मुलाची हत्या आई सुचना सेठ नेमकी कोण आहे जाणून घ्या.

[read_also content=”आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना सुरुवात, इराच्या हाताला लागली नुपूरच्या नावाची मेहंदी! https://www.navarashtra.com/movies/aamir-khan-daughter-ira-khan-marriage-function-started-in-udaipur-photos-of-mehendi-ceremony-goes-viral-nrps-496391.html”]

नेमकं प्रकरण काय?

गोव्यात चार वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी त्याची आई सुचना सेठला पोलिसांनी अटक  करण्यात आली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा  मृतदेह एका पिशवीत घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात असताना गोवा पोलिसांनी तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक केली.

कोण आहे सुचना सेठ?

सूचना सेठच्या लिंक्डइन पेजनुसार, ती एआय स्टार्टअप ‘माइंडफुल एआय लॅब’ची संस्थापक आणि सीईओ आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये AI Ethics मधील 100 सर्वात हुशार महिलांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. ती AI नीतिशास्त्रातील तज्ञ आणि डेटा सायंटिस्ट सुद्धा आहे. सूचना सेठने हार्वर्ड विद्यापीठासह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये सहसंशोधक म्हणून काम केलं आहे.

फिल्मीस्टाईलने आरोपी महिलेला अटक

सुचना सेठ आपल्या मुलासह गोव्यात आली होती. 6 जानेवारीपासून गोव्यातील कँडोलिम भागातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये राहत होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर सुचना सेठने अपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, तिला काही कामासाठी बंगळुरूला जायचे आहे आणि त्यांनी त्यासाठी टॅक्सीची व्यवस्था करावी. यावर कर्मचार्‍यांनी महिलेला टॅक्सीने जाणं अधिक महागात पडणार असल्याने टॅक्सीऐवजी फ्लाइटने जाण्याचा सल्ला दिला, मात्र महिलेने टॅक्सीनेच जाण्याचा आग्रह धरला.

यावर कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची व्यवस्था केली आणि ती महिला ८ जानेवारीला सकाळी बेंगळुरूला रवाना झाली. महिला निघून गेल्यानंतर कर्मचारी खोली साफ करण्यासाठी गेले असता त्यांना खोलीत रक्ताचे डाग दिसले. याबाबत त्यांनी लगेत पोलिसांना कळवलं. तसेच,  कर्मचार्‍यांनी पोलिसांना असेही सांगितले की ही महिला बंगळुरूला निघाली तेव्हा तिचा चार वर्षांचा मुलगा तिच्यासोबत नव्हता आणि तिने एक मोठी बॅग सोबत घेतली होती. त्यावर पोलिसांनी सुचना सेठला फोन करुन खोलीतील रक्ताचे डाग आणि मुलाबाबत विचारणा केली. यावर तिने सांगितले की, तिच्या मासिक पाळीमुळे ते डाग पडले होते आणि तिचा मुलगा तिच्या मित्राच्या घरी आहे, परंतु पोलिसांनी मित्राच्या घराचा पत्ता मागितला असता तो पत्ताही तपासात खोटा असल्याचं आढळलं.

हत्येचं कारण धक्कादायक

पोलिसांना संशय येताच त्यांनी महिलेला घेऊन जाणाऱ्या टॅक्सी चालकाला बोलावून जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. तसेच तिच्या मागावर गोवा पोलिसांचं एक पथकही पाठवण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी तिची बॅग तपासली असता त्यात तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. पतीला भेटू नये म्हणून तिने आपल्या मुलाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. महिलेचा तिच्या पतीकडून घटस्फोटाचा खटला सुरू आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीलाही या घटनेची माहिती दिली असून तो सध्या इंडोनेशियातील जकार्ता येथे आहे.

Web Title: Who is suchana seth who killed her 4 year son in goa nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • Goa
  • Karnataka

संबंधित बातम्या

5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप
1

5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप

Shantadurga Devi Temple: गोव्याची प्रसिद्ध कुलदेवता शांतादुर्गा देवी; काय आहे या देवीचे महत्त्व, इतिहास आणि प्रमुख उत्सव
2

Shantadurga Devi Temple: गोव्याची प्रसिद्ध कुलदेवता शांतादुर्गा देवी; काय आहे या देवीचे महत्त्व, इतिहास आणि प्रमुख उत्सव

कर्नाटकातील बदामी मधील ही आहेत 10 पर्यटन स्थळे! आत्ताच पाहून घ्या
3

कर्नाटकातील बदामी मधील ही आहेत 10 पर्यटन स्थळे! आत्ताच पाहून घ्या

हंपीला फिरायला जाताय? ही आहे हंपीमध्ये फिरण्यासारखी 10 बेस्ट ठिकाणे! आत्ताच पाहून घ्या
4

हंपीला फिरायला जाताय? ही आहे हंपीमध्ये फिरण्यासारखी 10 बेस्ट ठिकाणे! आत्ताच पाहून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.