पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ
बीडमध्ये संरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली. त्या दिवसापासून बीडच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात वाल्मिक कराडचं नव चर्चेत आहे. 9 डिसेंबरला झालेल्या या घटनेनंतर वाल्मिक कराड फरार होता. आज सकाळी साडेअकरा वाजता त्याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले. बीडच्या घटनेच्या दिवसापासून संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंट वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप संपू्र्ण गावातून होत आहे. अशातच त्याच्यावर इतर अनेक गुन्हेही दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पण हा वाल्मिक कराड नेमका आहे कोण, वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा विश्वासू कसा बनला , बीडमध्ये त्याचा प्रभाव कसा वाढत गेला, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. वाल्मिक कराडने सरेंडर केल्यानंतर आता सीआयडीकडून पुढील कारवाईला सुरूवात होईल.
Walmik Karad : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…
मूळचा परळी तालुक्यातील असलेला वाल्मिक कराड हा पांगरी गोपीनाथ गड गावचा रहिवासी होता. शेतकरी कुटुंबात वाल्मिकचा जन्म झाला. घरची परिस्थितीतीही हालाखीची होती. वाल्मिकने दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीत आला. पैसे मिळवण्यासाठी त्याची कसरत सुरू होती. त्यासाठी तो परळीतून भाड्याने व्हीसीआर आणायचा आणि गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा. त्यासाठी तो तिकीटाचे पैसेही घ्यायचा. हे सर्व सुरू असतानाच वाल्मिक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू असलेल्या फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला. फुलचंद कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी वाल्मिकला घरगडी म्हणून कामाला ठेवलं. घरात भाजीपाला, किराणा सामान, दूध, घरातली घरगड्याची छोटी -मोठी कामं वाल्मिक करू लागला. हे सर्व करता करता त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वासही संपादन केला.
हळूहळू वाल्मिक कराड परळीतील थर्मल प्लान्टमध्ये कंत्राट मिळू लागली. कराडच्या पाठिशी मुंडेंचं नाव जोडलं असल्यामुळे परळीत हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला होता. 1995 मध्ये त्याची वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत तुफाण हाणामारी झाली. हा सराजा सुरू असतानाच तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांनी बंदुकीतून गोळी झाडली आणि ती थेट वाल्मिकच्या पायाला लागली. त्यानंतर तो गोपीनाथ मुंडेचा त्याच्यावरचा विश्वास अधिकच वाढला.
Santosh Deshmukh: “वाल्मीक कराडवर गुन्हा दाखल होणार नाही कारण याचा बाप
गोपीनाथ मुंडेंसाठी काम करताना वाल्मिक गोपीनाथ मुंडे यांचे बंधु पंडित अण्णा मुंडें यांच्याही संपर्कात आला. पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिकचा संबंध वाढला. हळूहळू त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतरही वाल्मिकने धनंजय मुंडेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मुंडे घराण्याचं नाव पाठिशी असल्यामुळे परळीच्या राजकारणातही त्याचा दबदबा वाढू लागला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची मैत्री वाढू लागली. गेल्या दहा वर्षात बीडच्या राजकारणात धनंजय मुंडेंचे दबदबा वाढला, त्यामुळे वाल्मिक कराडचे वर्चस्वही वाढू लागले. त्यामुळे बीडच्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोण असावा? याचेही निर्णय वाल्मिकच्या मर्जीने होऊ लागले होते, अशी चर्चा आहे. पण 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. तेव्हापासून वाल्मिक फरार होता. अखेर आज त्याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले.