जितेंद्र आव्हाड यांची वाल्मीक कराडच्या शरणागतीवर प्रतिक्रिया (फोटो- सोशल मिडिया)
संतोष देशमुख प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात सातत्याने ज्यावर आरोप केले जात आहेत तो वाल्मीक कराड हा सीआयडीसमोर शरण आला आहे. पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मीक कराड अखेर शरण आला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप होताना पाहायला मिळत आहे. वाल्मीक कराडला आता कोर्टात हजर केले जाणार की नाही हे पहावे लागेल. तर या प्रकरणी आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “वाल्मीक कराडवर 302 चा गुन्हा दाखल अजिबात दाखल होणार नाही कारण याचा बाप केबिनमध्ये बसला आहे. वाल्मील कराड हा शरण येणार हे मी आधीच सांगितले होते. फक्त हे सर्व से करण्यासाठी इतके दिवस लागले. आत्ताच्या केस मध्ये जे अधिकारी आहेत त्यांनीच त्याला मदत केली आहे. संतोडह देशमुख प्रकरणात सरकारी वकील देत असताना देशमुख कुटुंबीयांना विश्वासात घेऊन द्यावा. ”
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “हा एक प्लॅन होता. तो पुण्यात शरण येतो. म्हणजे तो पुण्याची जवळपास असण्याची शक्यता असू शकते. लोकांच्या मनात संशय आहे. माझ्या मनात संशय आहे. वाल्मीक कराडवर अजून 302 चा गुन्हा कुठे दाखल केला आहे? संतोष देशमुख हा भाजपचा होता आमच्या पक्षाचा नव्हता, पण माणुसकी जिवंत राहावी यासाठी आम्ही लढतो आहोत. 302 चा गुन्हा जोपर्यंत वाल्मिक कराडवर दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेने शांत बसू नये.”
हेही वाचा: मोठी बातमी ! वाल्मिक कराड याचं पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण
वाल्मिक कराड याचं आत्मसमर्पण
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने आज सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. सीआयडीने आतापर्यंतच्या केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची 100 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे.
वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले होते. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले होते. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पाठवण्यात येणार होत्या. तत्पूर्वी त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा संशयित वाल्मिक कराड हा फरार होता. विशेष म्हणजे तो मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा आरोपही देशमुख यांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. एकीकडे सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना दुसरीकडे बीड पोलीसदेखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याने आत्मसमर्पण केले आहे.