
crime (फोटो सौजन्य: social media)
पत्नी चार मुलांना सोडून पळाली
नवऱ्यावर अश्लील मागणीचा आरोप
जिल्ह्यात खळबळ, तपास सुरू
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशात एटी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. चार मुलांना सोडून एक महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. जेव्हा पतीने बायको बेपत्ता असल्याची तक्रार केली तेव्हा पोलिसांनी तिला पकडल. त्या नंतर जेव्हा तिला कोर्टात हजर करण्यात आल तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसला. बायकोने आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप केले. हे कारण ऐकून पत्नीने प्रियकरसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. चार मुले असूनही तिने सोडण्याचा निर्णय घेतला.
Latur Crime: लातूरमध्ये दुहेरी हत्याकांड! पिता-पुत्राचा धारदार शस्त्राने खून, गावात भीतीचं सावट
पतीला सोडून प्रियकरसोबत का गेली ?
पत्नीला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तिने गंभीर आरोप नवऱ्यावर केले आहेत. पती रोज दारू पिवून यायचा आणि त्यातून तो शिवीगाळ करत असायचा. या सगळ्या त्रासाला मी कंटाळले होते. त्यातून मला मुक्तता हवी होती. रोज घरी येवून शिवीगाळ करणे हे नित्याचे झाले होते म्हणून मी निर्णय घेतला. या सगळ्या प्रकरणानंतर तिने नवऱ्यावर गंभीर आरोप केले की पती मला दुसऱ्या पुरुषसोबत संबंध ठेवायला सांगत आहे.
मनीषाने प्रियकर कसा पटवला ?
तिची प्रियकर सोबत सोशल मीडियावर ओळख झाली. मैत्रीच रूपांतर हे प्रेमात झालं. त्या नंतर तिने त्याच्या सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. मी चार मुलांना सोडून त्याच्या सोबत जाण्याची तिने कोर्टासमोर इच्छा व्यक्त केली.
तिच्यावर कारवाई करा सासऱ्याची मागणी
आमच्या मुलाचा संसार हिने उघड्यावर आणला आहे. हिने आणि हिच्या प्रियकराने माझ्या मुलाच वाटोळ केल आहे. तिच्यावर मुलांना सोडल्याप्रकरणात कारवाई करावी ही मागणी केली आहे. मुकेश यादव सोबत तिने आता संसार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.