Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: बेकायदेशीर पिस्तूल हातात… ट्रिगर दाबताच सुटली गोळी; क्षणभराची मस्ती ठरली जीवघेणी!

वाळूजमध्ये बेकायदेशीर पिस्तूल पाहताना चुकून सुटलेल्या गोळीने तरुण गंभीर जखमी झाला. मित्राने गोळीबाराची खोटी कहाणी सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पोलिसांनी आरोपीला अटक करून पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 08:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वाळूज परिसरात पिस्तूल हाताळताना चुकून गोळी सुटली
  • मित्राच्या मांडीत घुसली गोळी,उपचार सुरु
  • सुरुवातीला खोटा गोळीबाराचा बनाव केला
  • सखोल चौकशीत सत्य उघड
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात क्षणभराच्या निष्काळजीपणातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेकायदेशीर पिस्तूल हाताळताना चुकून सुटलेल्या गोळीमुळे एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची बनावट कथा सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर संपूर्ण सत्य उघडकीस आले.

Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

काय घडलं नेमकं?

या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव महेश दत्तात्रय पवार (वय 23, रा. बजाजनगर, वाळूज एमआयडीसी परिसर) असे आहे. तर त्याच्यावर गोळी झाडणाऱ्या तरुणाचे नाव अझहर शफी सय्यद (वय 40, रा. अन्सार कॉलनी, सरोज स्कूलशेजारी, पडेगाव) असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मस्तीत लागली गोळी

अझहरचा मृत भाऊ इम्रान सय्यद याने आणलेले पिस्तूल व त्यातील 4 राऊंड तो सोबत घेऊन फिरत होता. वाळूज येथील शिवराई फाटा परिसरात, सपना हॉटेलशेजारील मोकळ्या जागेत तो आणि महेश बसले होते. त्यावेळी पिस्तूल पाहत असताना चुकून गोळी सुटली. ही गोळी महेशच्या उजव्या पायाच्या मांडीत घुसली. हे घडताच अझहर घाबरला त्यानेच महेशला घाटी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांची दिशाभूल

तिथे डॉक्टरांनी महेशवर उपचाराला सुरुवात केली आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी विचारपूस करताच त्याने तिथे सुरुवातील खोटी कथा सांगितले. त्याने सांगितले कि दोघेही रात्री सव्वा अकराच्या सुमारास लिंबेजळगाव टोलनाका ते वाळूजदरम्यान ढोरेगाव फाट्याजवळून मोटारसायकलने जात असताना अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आणि त्यात मित्राला गोळी लागली.

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. मात्र अझहरने सांगितलेले कारण याच्यावर पोलिसांना संशय आला. डॉक्टरांनी जखमी जबाब देण्याच्या स्थितीत असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी महेश व अझहर यांची चौकशी केली. मात्र, दोघांकडूनही विसंगत व उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. पोलिसांना हा खोटा बनाव लक्षात आला. अझहरला वाळूज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांनी अझहरची सखोल चौकशी केली. तेव्हा सगळं उघडकीस आले. त्याने घडलेल्या घटनेची कबुली दिली.

पिस्तूल आणि जीवन काडतुसे जप्त

पोलिसांनी अझहरच्या पडेगाव येथील घराची झडती घेतली. घराबाहेरील निळ्या ड्रममध्ये सुमारे 30 हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि त्यातील 3 हजार रुपये किमतीची 3 जिवंत काडतुसे मिळून आली. ती सर्व शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस या घटनेची सखोल तपासणी करत असून बेकायदेशीर शस्त्र खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

Gujrat Crime: ६३ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; गर्भवती राहताच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात.

  • Que: गोळी कशी सुटली?

    Ans: बेकायदेशीर पिस्तूल पाहताना चुकून ट्रिगर दाबल्याने.

  • Que: आरोपीने सुरुवातीला काय सांगितले?

    Ans: अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची खोटी माहिती दिली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar an illegal pistol in hand the bullet fired as soon as the trigger was pulled a moment of recklessness proved fatal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
2

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
3

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
4

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.