crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
अकोला: अकोल्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अकोला शहरातील शिवापूर म्हाडा कॉलनी परिसरात पती-पत्नीतील वादातून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव मीरा मुरलीधर मानकर (वय 37) असे आहे. ती एका मुलाची आई होती.
गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक
नेमकं काय घडलं?
अकोला शहरातील खदान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीरा आणि तिच्या पती मुरलीधर यांच्यात काही काळांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. याच वादांमुळे पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुरलीधर यांनी घर सोडले होते. याबाबतची तक्रारदेखील खदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याचा सततच्या वादाचा त्रास झाल्याने मीरने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिरच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा आहे. त्यातून पत्नी मीराने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तपास सुरु
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला. तपासादरम्यान घटनास्थळी महिलेची चप्पल, मोबाईल फोन आणि इतर साहित्य आढळले. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. मात्र पती पत्नीच्या वादामुळे एका दहा-बारा वर्षांच्या मुलाच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत
अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. एका नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या नराधमाला अटक करण्यात आली असून आहे. चिमुकीली हि केवळ पाच वर्षांची आहे असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. सद्यस्थितीत मुलीची प्रकृती स्थिर आहे.
हा गंभीर प्रकार समोर येताच काही तासातच खदान पोलीसांकडून नराधमाला अटक करण्यात आली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा चिमुकलीचे आई गरबा खेळण्यासाठी बाहेर गेली होती. याचीच संधी साधून सावत्र बापाने आपल्या पाच वर्षाची चिमुकलीवर अत्याचार केला. मुलीचे पोट जास्त दुखू लागल्याने तिने आई घरी परतल्यानंतर सर्व प्रकार सांगितला. आईने तातडीने रुग्णालयात दाखल केला असता हा संपूर्ण प्रकार समोर आलाय.
Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना