Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! पतीच्या आत्महत्येने पत्नी निराश; मुलीसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्याने घरात नातेवाईक मुक्कामी होते. त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता. पोटच्या सहा मुलींचे पुढे कसे काय होणार याविचाराने हताश झाली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 11, 2025 | 08:04 AM
पतीच्या आत्महत्येने हताश झालेल्या पत्नीने मुलीसह विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

पतीच्या आत्महत्येने हताश झालेल्या पत्नीने मुलीसह विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

Follow Us
Follow Us:

कुर्डुवाडी : घाटणे (ता.माढा) येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवारी (दि.६) आत्महत्या करून जीवन संपवलं होतं. हरिभाऊ यांचा विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्यांच्या पत्नीने चार वर्षांच्या मुलीसह त्याच रात्री एकच्या सुमारास सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.९) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. एकाच कुटुंबातील तीन आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली.

जनाबाई हरिभाऊ लोंढे (वय ३२) व मुलगी साजरी हरिभाऊ लोंढे वय (४) असे आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि.६) दुपारी हरिभाऊ जानु लोंढे (रा. घाटणे ता.माढा) घरातील लोखंडी ॲंगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री घाटणे (ता.माढा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्याने घरात नातेवाईक मुक्कामी होते. त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता. पोटच्या सहा मुलींचे पुढे कसे काय होणार याविचाराने हताश झालेल्या पत्नीने त्याच रात्री टोकाचे पाऊल उचलले. रात्री एकच्या सुमारास कोणालाही न सांगता ४ वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरात सदर महिला व तिची लहान मुलगी नसल्याचे नातेवाईकांना समजले. त्यावर नातेवाईक व गावातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली. परंतु, मिळून न आल्याने शुक्रवार (दि.७) रोजी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात जनाबाई हरिभाऊ लोंढे व त्यांची मुलगी साजरी ही बेपत्ता असल्याची नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्वत्र शोध सुरु असताना (दि.९) रोजी गावातील शाळकरी मुलांना गावातील जानुबाई मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला व मुलगी वर तरंगताना दिसली.

मुलांनी ही गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर सदर महिलेचे नातेवाईकही तिथे आले. त्यांनी बेपत्ता असलेल्या माय-लेकी याच आहेत हे ओळखले. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या दोघींना विहिरीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली.

Web Title: Woman comiited suicide with her daughter incident in kurduwadi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 08:04 AM

Topics:  

  • Solapur News
  • Suicide case

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
2

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
3

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.