Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Woman Harassment News: “तू मला खूप आवडतेस…” वरिष्ठाकडून महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग; जुना राजवाडा पोलिसांत तक्रार!

Woman Harassment News: कोल्हापूरमधून एसटी महामंडळाला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. महामंडळाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्वतःच्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याकडे दारू आणि पार्टीची विकृत मागणी करत तिचा अश्लील भाषेत विनयभंग केला. विरोधानंतर तिची तडकाफडकी बदलीही करण्यात आली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 01, 2026 | 01:03 PM
Woman Harassment News: "तू मला खूप आवडतेस..." वरिष्ठाकडून महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग; जुना राजवाडा पोलिसांत तक्रार!

Woman Harassment News: "तू मला खूप आवडतेस..." वरिष्ठाकडून महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग; जुना राजवाडा पोलिसांत तक्रार!

Follow Us
Follow Us:
  • महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी सुरक्षा अधिकारीवर गुन्हा दाखल
  • दारू-पार्टीची मागणी फेटाळल्याने महिलेचा अपमानास्पद छळ
  • १ ऑगस्टला पुन्हा विनयभंग केल्याने त्रस्त महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली
Woman Harassment News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (ST) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद कृत्य कोल्हापुरात उघडकीस आले आहे. कर्तव्यावर असलेल्या एका महिला सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याकडे अनुचित आणि विकृत मागणी करत तिची मानसिक पिळवणूक व विनयभंग केल्याप्रकरणी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ताराबाई पार्कमधील अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास कमलाकर मदने (वय ४२, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) असे गुन्हा नोंद झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मदने हा एसटी महामंडळात सुरक्षा आणि दक्षता अधिकारी या संवेदनशील पदावर कार्यरत आहे. जिल्ह्यातील विविध बस स्थानकांना भेटी देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणे हे त्याचे मुख्य काम होते. याच महामंडळात कंत्राटी/सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावणाऱ्या एका महिलेने आरोपीविरोधात धाडसाने तक्रार नोंदवली आहे.

हेही वाचा: Pune Crime News: पुण्यात आलिशान फ्लॅटवर लंडनच्या विद्यार्थिनीचा ५ दिवस कुजलेला मृतदेह; एसीमुळे शेजाऱ्यांनाही लागला नाही सुगावा!

अनादर, त्रास आणि परस्पर बदलीचा प्रकार

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्यात आरोपी भानुदास मदने याने एका कर्मचाऱ्यामार्फत पीडित महिलेकडे दारू आणि पार्टीची व्यवस्था करण्याचा निरोप पाठवला होता. महिलेने या अत्यंत अयोग्य मागणीला स्पष्ट शब्दांत धुडकावून लावले. या नकाराचा राग मनात धरून मदने याने पीडितेला सतत विभागीय कार्यालयात बोलावून तिची हेटाळणी करणे व मानहानी करणे सुरू केले. पीडित महिलेने या त्रासाबाबत वरिष्ठ अधिकारी निरीक्षक सचिन काळभैरी आणि नामदेव पाटील यांच्याकडे तोंडी तक्रार केली होती. त्यांनी मदनेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या वर्तनात काहीही बदल झाला नाही. उलट, तक्रार केल्याचा बदला म्हणून संबंधित महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली.

१ ऑगस्टची थरारक घटना अन् पोलिसांत धाव

बदलीनंतर १ ऑगस्ट रोजी पीडित महिला काही कामानिमित्त मदने याला भेटण्यासाठी गेली असता, त्याने पुन्हा एकदा मर्यादेचे उल्लंघन केले. “तू मला संपर्क का करत नाहीस? तू मला खूप आवडतेस, मला बाहेर भेटायला चल,” अशा अश्लील व लज्जास्पद भाषेचा वापर करत त्याने तिचा विनयभंग केला. सततचा वाढता मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक आणि विनयभंगाच्या घटनांमुळे खचलेल्या या महिला कर्मचाऱ्याने अखेर धाडस दाखवून जुना राजवाडा पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या सविस्तर फिर्यादीवरून पोलिसांनी भानुदास मदने याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस पथक करत आहे.

हेही वाचा: Student Suicide News: “मी तुला सांभाळले असते…” पेपरच्या तणावातून एकुलत्या एका मुलाने संपवले आयुष्य; सांगलीत शोककळा!

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा प्रकार कुठे घडला आणि आरोपी अधिकारी कोण आहे?

    Ans: ही घटना कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आरोपीचे नाव भानुदास कमलाकर मदने (वय ४२) आहे. तो एसटी महामंडळात सुरक्षा व दक्षता अधिकारी आहे.

  • Que: पीडित महिलेवर आरोपीने काय दबाव आणला होता?

    Ans: आरोपीने महिलेकडे दारू व पार्टीची सोय करण्याची मागणी केली होती आणि ती नाकारल्याने तिचा सातत्याने मानसिक छळ व विनयभंग केला.

  • Que: पोलिसांत गुन्हा कधी आणि कुठे दाखल झाला?

    Ans: पीडित महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १ ऑगस्टच्या घटनेनंतर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman harassment kolhapur msrtc officer employee sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • bus
  • Kolhapur Crime
  • Woman Harassments
  • women employment

संबंधित बातम्या

Yavatmal Rod Attack: यवतमाळमध्ये खासगी वाहनचालकाची मुजोरी! साईड देण्यावरून बसचालकाला लोखंडी रॉडने केली मारहाण
1

Yavatmal Rod Attack: यवतमाळमध्ये खासगी वाहनचालकाची मुजोरी! साईड देण्यावरून बसचालकाला लोखंडी रॉडने केली मारहाण

Kolhapur Crime News: चोरी केली, थार घेतली अन् चुलत्याकडूनच कौतुक करून घेतले! कोल्हापुरातील अजब चोरीचा पर्दाफाश
2

Kolhapur Crime News: चोरी केली, थार घेतली अन् चुलत्याकडूनच कौतुक करून घेतले! कोल्हापुरातील अजब चोरीचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.