सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय हा कष्टाळू मुलगा होता. दिवसा मेहनत करून आणि रात्र शाळेत जाऊन तो आपले शिक्षण पूर्ण करत होता. सध्या त्याची बारावीची परीक्षा सुरू होती. मात्र, नुकताच झालेला ऑक्टोबरमधील एक पेपर अपेक्षेपेक्षा खूप अवघड गेल्यामुळे तो तीव्र मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात वावरत होता.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसताना त्याने साडीच्या साहाय्याने घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला. काही वेळेने त्याची आई कामावरून घरी परतली, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. कितीही हाक मारली तरी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, दत्तात्रयने गळफास घेतल्याचे भयानक दृष्य समोर आले. उपस्थितांनी तातडीने त्याचा गळफास सोडवून त्याला तातडीने शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दत्तात्रय हा नरळे कुटुंबातील एकमेव मुलगा होता. आपल्या लाडक्या मुलाने नैराश्यातून असे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजताच आईला मोठा धक्का बसला. “फक्त पेपर अवघड गेला म्हणून टोкаचे पाऊल उचलण्याची काय गरज होती? मी तुला आयुष्यभर कोणत्याही संकटातून सांभाळले असते रे!” असे म्हणत आईने फोडलेला हंबरडा उपस्थित सर्वांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात अभ्यास व पेपरच्या तणावातूनच मुलाने हे कृत्य केल्याचे पालकांनी सांगितले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Ans: सांगली शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील भगत प्लॉट भागात ही दुर्दैवी घटना घडली.
Ans: दत्तात्रय विठ्ठल नरळे (वय १८) असे त्याचे नाव असून, तो दिवसा काम करून रात्र शाळेत बारावीचे शिक्षण घेत होता
Ans: बारावीचा पेपर अवघड गेल्यामुळे आलेल्या तीव्र नैराश्यातून आणि तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.






