crime (फोटो सौजन्य: social media)
हैदराबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे अशी चिठ्ठी लिहीत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलं आहे. ही धक्कदायक घटना हैदराबादच्या हिमायतनगर भागात घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव पूजा जैन असं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणाबाबत सविस्तर अधिकची माहिती अशी की, हैदराबादच्या हिमायतनगर भागातील ४३ वर्षीय पूजा जैन या महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून टोकाचे पाऊल उचलले. ही घटना तिचा पती अरुण कुमार जैन त्याच्या ऑफिसला गेला असतांना घडली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
चिठ्ठीत काय?
या सुसाईड नोटमध्ये पूजाने लिहिले होते की, ती देवाला भेटण्यासाठी स्वतःचे बलिदान देत आहे. तिने पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे पाऊल उचलले आहे. जेणेकरून ती परमेश्वराच्या जवळ जाऊ शकेल, असे देखील चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, सध्या कोणताही कट किंवा मानसिक आजार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला नाही आहे. पोलीस प्रत्येक दिशेने या प्रकरणाचा तपास करत आहे.
शेजाऱ्यांनी काय सांगितलं?
जैन यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पूजाला ध्यान, उपासना आणि धार्मिक ग्रंथाचं विशेष आकर्षण वाटू लागले होते. ती अनेकदा सांगयची की, तिला आता सांसारिक जीवनातून मुक्तता हवी आहे आणि देवाच्या चरणी शरण जाऊन आश्रय घ्यायचा आहे. असे त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
MBBS चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, पोलिसांना माहिती मिळताच…