गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी (फोटो सौजन्य-X)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात नागपूरमध्ये एमबीबीएसच्या अंतिम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. घरातील बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून गळफास लावून त्याने आयुष्य संपवले. दरवाजा तोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या आत्महत्येने एकच खळबळ उडाली.
संकेत दाभाडे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो एम्स हॉस्पिटलमध्ये शेवटच्या वर्गात शिकत होता. घटनेच्या शाल बाथरूममध्ये गेला. बाथरूमच्या दरवाज्याला शाल बांधून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सोनगाव पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. संकेत घराबाहेर आलाच नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले. खोलीमध्ये कोणतीही हालचाल नव्हती. कोणताही आवाज येत नव्हता.
दरम्यान, संकेत दिसला नाही म्हणून इतर विद्यार्थ्यांना संशय आला. त्यांनी या संदर्भातील माहिती वार्डनला दिली. वार्डनने संकेतच्या खोलीचा दरवाजा तोडला. तसेच बाथरूमचाही दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
पोलिसांकडून तपास सुरु
संकेत हा तरूण एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. त्याने अचानक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले यावरून एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे. याच्या अधिक तपासानंतर सत्य समोर येणार आहे.
नागपुरातच यापूर्वी आत्महत्येचे प्रकरण उघडकीस
दुसऱ्या एका घटनेत, नागपूर येथे एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. जेव्हा आरोपी प्रियकराचे खरे रूप पुढे आले तेव्हा तिला धक्काच बसला. यामध्ये तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला होता. याप्रकरणी नागपूर येथील अजनी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यात आत्महत्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. असे असताना आता MBBS चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.