Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लास्टिकच्या पिशवीत सापडले महिलेचं छिन्नविछिन्न अवस्थेत शीर, पोलिसांकडून धडाचा शोध सुरू

कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचे छिन्नविछिन्न अवस्थेत शीर सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेची ओळख पटविण्यासाठी आणि तिचे नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी प्रथम तपास केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 13, 2024 | 07:10 PM
प्लास्टिकच्या पिशवीत सापडले महिलेचं छिन्नविछिन्न अवस्थेत शीर, पोलिसांकडून धडाचा शोध सुरू

प्लास्टिकच्या पिशवीत सापडले महिलेचं छिन्नविछिन्न अवस्थेत शीर, पोलिसांकडून धडाचा शोध सुरू

Follow Us
Close
Follow Us:

दिवसेंदिवस माणसामधील संवेदनशीलता नष्ट होत आहे, ही बाब कोलकातातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. कोलकाता येथील गोल्ड ग्रीन परिसरात कचरा वेचणाऱ्या वाहनात एका महिलेचे छिन्नविछिन्न शीर दिसल्याने खळबळ उडाली होती. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचे छिन्नविछिन्न अवस्थेत शीर पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचे छिन्नविछिन्न शीर सोबत घेतले. मात्र या महिलेचा मृतदेह किंवा तिच्या शरीराचे अवयव जवळपास कुठेही सापडले नसल्याची शक्यता पोलिस व्यक्त केली आहे. यानंतर अशा जघन्य गुन्ह्यामागे जबाबदार असलेल्यांचा शोध घेतला जाईल. स्थानिक लोकांना महिलेची ओळख पटू शकली नाही. तपास अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. कोलकाता पोलिस उपायुक्त बिदिशा कलिता घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, गजबजलेल्या परिसरात महिलेचे छिन्नविछिन्न शीर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

९० दिवस उलटूनही CBI आरोपपत्र दाखल करू शकली नाही; संदीप घोष, अभिजित मंडल यांना जामीन मंजूर

बुधवारी रात्रीच्या वेळी कोलकात्याच्या दक्षिणेकडील सीमेवर असलेल्या ठाकूरपुकुरमध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून गोणीत गुंडाळलेल्या माणसाचा कुजलेला मृतदेह सापडला. या प्रकरणातही मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणात मयत इकडे-तिकडे फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा.

पुणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ परिसरातून तीन मोबाईल हिसकावले

आईला शाळेत जाण्यासाठी उठवलं, मुलाने केली हत्या

तर दूसरीकडे एक महिला पहाटे अकरावीच्या वर्गातल्या मुलाला शाळेत जाण्यासाठी उठवण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिला माहित नव्हते की हा मुलगा तिच्या मृत्यूचे कारण बनणार आहे. 3 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये आरती देवी वर्मा या महिलेने आपला 17 वर्षांचा मुलगा अमनला शाळेत जाण्यासाठी उठण्यास सांगितले. पण अमनला शाळेत जावंसं वाटत नव्हतं. उठायला सांगितल्यावर तो संतापला आणि त्याने आईला जमिनीवर ढकलले. यामुळे आरती देवीचे डोके भिंतीवर जोरात आदळले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

आईची हत्या केल्यानंतर अमनने सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडले. घराला बाहेरून कुलूप लावून चार दिवस मृतदेह घरातच ठेवला. आरती देवीच्या अंगाला कुजून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा तिने अगरबत्ती जाळण्यास सुरुवात केली. पाचव्या दिवशी अमन घरातून बाहेर आला आणि जवळच्या मंदिरात जाऊन बसला.

Web Title: Woman mutilated head was found in a garbage dumping vehicle in kolkata gold green area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 07:07 PM

Topics:  

  • Kolkata

संबंधित बातम्या

Kolkata Law College Rape Case: “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर…”; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला
1

Kolkata Law College Rape Case: “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर…”; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला

Kolkata Law College Rape Case: कोलकाता बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई
2

Kolkata Law College Rape Case: कोलकाता बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

Kolkata Law College Rape Case: “मला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी…”,  विद्यार्थीनीने सांगितला ‘तो’ भयंकर अनुभव
3

Kolkata Law College Rape Case: “मला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी…”, विद्यार्थीनीने सांगितला ‘तो’ भयंकर अनुभव

Kolkata Law College News : कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, TMC च्या नेत्यासह तिघांना अटक
4

Kolkata Law College News : कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, TMC च्या नेत्यासह तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.