संदीप घोष आणि अभिजित मंडल यांना जामीन मंजूर (फोटो सौजन्य-X)
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी ९० दिवसांनंतरही सीबीआयला आरोपपत्र दाखल करता आलेलं नाही. या प्रकरणी आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळा पोलिस ठाण्याचे माजी आयसी अभिजित मंडल यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयाने दोघांना 2000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
जामीन मिळाल्यानंतरही अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. अटींची पूर्तता झाल्यानंतरच अभिजीत मंडलची तुरुंगातून सुटका होणार असल्याची माहिती आहे. पण, संदीप घोषची तुरुंगातून सुटका आता शक्य नाही. कारण त्यांच्यावर आरजी कर भ्रष्टाचाराचा खटलाही अद्याप सुरु आहे. कोलकाता प्रकरणातीस संदीप घोष यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
सीबीआयने संदीप घोष आणि अभिजित मंडल यांच्यावर लेडी डॉक्टर हत्या-अत्याचार प्रकरणात पुरावे खोटे केल्याचा आरोप केला होता. याशिवाय या प्रकरणावर प्रभाव टाकल्याचे आरोपही अनेकदा समोर आले आहेत.पण, सीबीआयला दोन्ही आरोपींना ताब्यात घ्यायचे नसल्याचे आजच्या सुनावणीत दिसून आले. त्यानंतरच जामीन मिळण्याची शक्यता बळावली होती. दरम्यान, आरोपपत्र दाखल करण्याची ९० दिवसांची मुदतही संपली आहे. अखेर या प्रकरणात संदीप घोष आणि अभिजीत मंडल यांना जामीन मिळाला.
शुक्रवारी सीबीआय कोर्टात आरजी हत्या आणि अत्याचार प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणी पुराव्याशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या संदीप आणि अभिजीत यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची मुदत संपली असल्याचे सीबीआयने म्हटले आहेय त्यामुळे न्यायालयाला कायद्यानुसार निर्णय घेण्यास सांगण्यात आले.
दुसरीकडे, संदीप घोष आणि अभिजित मंडल यांना जामीन मिळाल्याच्या वृत्ताने मृत डॉक्टरच्या वडिलांनी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले की ते तपास योग्य पद्धतीने करत नसल्याचे पुरावे आढळून आले आहेत. आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. अत्याचार आणि खुनाचे प्रकरण तापले होते. अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर कोलकाता पोलिसांनी नागरी स्वयंसेवक संजय रॉय यांना अटक केली होती. नंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा संदीप घोष आणि अभिजित मंडल यांची वारंवार चौकशी करण्यात आली. या दोघांनाही सीबीआयने आधी आरजी कर भ्रष्टाचार प्रकरणात आणि नंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती.