Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?

यवतमाळच्या बोथ गावात 6 वर्षीय शिवानीची सोन्याच्या नथीसाठी गळा आवळून हत्या करण्यात आली. आरोपींनी मृतदेह पोत्यात लपवला. पोलिसांनी तपासातून एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 23, 2026 | 02:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या
  • मृतदेह पोत्यात भरून घरात लपवला
  • एकाच कुटुंबातील 5 आरोपी अटकेत
यवतमाळ: यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या अर्ध्या ग्रॅम सोन्यासाठी शेजारच्या कुटुंबातील पाच जणांनी तिचा गळा आवळून हत्या केली. नंतर मृतदेह घरातच पोत्यामध्ये बांधून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार तालुक्यातील दारव्हा येथील बोथ येथे घडला. पोलिसांनी चिमुकली दिसली, त्या शेवटच्या ठिकाणावरूनच गुन्ह्याचा उलगडा करत अल्पवयीन मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

काय घडलं नेमकं?

शिवानी पंकज जाधव (६) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. शुक्रवारी २० मार्च रोजी सकाळी तिला आरोपींनी टरबूज खाण्यासाठी घरात बोलावले. शिवानी व तिचा लहान भाऊ दोघेही तेथे पोहोचले. आरोपी सोनू विलास जाधव याचा टरबूज विक्रीचा व्यवसाय असल्याने त्याने दोघांना टरबूज दिले. शिवानी तेथेच थांबली, तर तिचा भाऊ हा घराकडे निघून गेला. त्यानंतर तिच्या नाकातील नथ बळजबरीने आरोपी सोनू जाधव याच्या मुलीने काढून घेतली. त्यांनतर घडलेला सगळा प्रकार शिवानी घरी सांगणार असे त्याला वाटले, याच भीतीतून तिचा गळा आवळून तिला ठार केले. नंतर तिचा मृतदे पोत्यात भरून घरातील पलंगाखाली ठेवला.

Ashok Kharat प्रकरणात वैभव नाईक यांची मोठी मागणी; म्हणाले…

मात्र उशीर झाला तरीही शिवानी घरी परतली नाही, कुटुंबीयांनी शोध-शोध केली असता सापडली नाही. कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध शाखांच्या आठ टीम तयार करून सर्वत्र शोध घेतला. गावातील संशयितांची घरझडती घेतली, तरीही शिवानीचा थांगपत्ता लागत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी शिवानीच्या शेवटच्या लोकेशनवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू करण्यात आला.

सोनू जाधव याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शिवानी गावा बाहेर जाताना दिसल्याचे सांगितले. मात्र, यावेळी सोनू सोबत असणाऱ्याने आम्हाला कुणीच दिसले नाही असे सांगताच, सोनू जाधव खोटा बोलत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला, तेव्हा शिवानीचा मृतदेह विलास जाधव याच्या घरात आढळून आला.

आरोपीचा ऑटोने गावोगावी फिरून टरबूज विक्रीचा व्यवसाय आहे. शिवणीचा हत्या केल्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळी याच टरबुजाच्या ऑटोत पोत्यात भरलेला मृतदेह टाकून विल्हेवाट लावण्याचा कट रचण्यात आला होता. परंतु, शनिवारी सकाळी पोलिसांनी कुणालाच गावाबाहेर पडू दिले नाही. त्यामुळे व्हिलेवाट लावल्याचा प्रयत्न उधळला.

आरोपी अटकेत

ही थरारक घटना पोलिसांनी शनिवारी दुपारी उघड केली. बेपत्ता शिवानीचा मृतदेह पाहून संपूर्ण बोथ गाव हळहळले. या गुन्ह्यातील नराधम कैलास विलास जाधव (३०), माला कैलास जाधव (२६), सोनू विलास जाधव (३२), रंजना सोनू जाधव (३०) आणि एक विधी संघर्ष मुलगी, यांना ताब्यात घेतले. तपास अधिकारी शिवप्रकाश मुळे यांनी रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ५ एप्रिलपर्यंतची पोलिस कोठडी दिली आहे.

इन कॅमेरा उत्तरीय तपासणी

शिवानीच्या मृतदेहाची यवतमाळ येथे इन कॅमेरा उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता मृतदेह बोथ येथे आणून अंत्यसंस्कार केले. यावेळी संपूर्ण गाव जमा झाले होते, तीच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. एका क्षुल्लक दागिन्यासाठी चिमुकलीला मारून टाकण्यात आल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करण्यात आले आहे.

Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: मुलीच्या नाकातील सोन्याच्या नथीसाठी तिची हत्या करण्यात आली.

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: आरोपींच्या घरात पोत्यात लपवलेल्या अवस्थेत सापडला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Yavatmal crime 6 year old girl murdered for a gold nose ring 5 members of the same family arrested what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • crime
  • Yavatmal
  • Yavatmal Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण
2

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Yavatmal News: दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप
4

Yavatmal News: दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.