Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी

Yavatmal News: पावसाअभावी जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी होत असल्याने हलक्या जमिनीतील सोयाबीनला सर्वाधिक फटका बसत आहे. पाने पिवळी पडणे, झाडांची वाढ खुंटणे, पाने सुकणे आणि झाडे कोमेजणे अशी लक्षणे अनेक शेतांमध्ये दिसत आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2026 | 11:20 AM
पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी

पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी

Follow Us
Follow Us:

Yavatmal News: आभाळ भरून येते, पण पाऊस मात्र बरसत नाही. पावसाच्या दीर्घ खंडाने यवतमाळ जिल्ह्यातील खरीप सोयाबीन पिकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत पिकाला पाण्याची गरज असताना जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने अनेक भागांत सोयाबीनची पाने पिवळी पडली असून झाडे कोमेजू लागली आहेत. त्यातच ढगाळ आणि दमट वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी संकट उभे ठाकले आहे.(फोटो सौजन्य – AI)

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे सुमारे २ लाख ७२ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात यंदा मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील पिकाला सध्या पावसाच्या खंडाचा फटका बसत आहे. पावसाने मोठा खंड घेतला आहे. ऑगस्टपासून आतापर्यंत पावसाची अनियमिता आणि दिर्घ खंडाचा आता थेट पिकांच्या अवस्थेवर परिणाम दिसू लागला आहे.

यवतमाळ तालुका सह संपूर्ण जिल्ह्यात सोयाबीन पिवळे पडले आहे. पिके कोमेजली आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेत ओलाव्याअभावी उत्पादन घटण्याची भीती आहे. दमट वातावरणामुळे सोयाबीनवर वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत शेतकऱ्यांना पानांवर डाग, पिवळेपणा आणि किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दरम्यान कापूस पिकाचीही अशीच परिस्थिती दिसत आहे. पाऊसाच्या भरवशावर असलेली कापसाची रोपे कोमजत आहेत. तर ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, असे शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी शेतांमध्ये धडपड करताना दिसत आहे.

यंदा तब्बल ४ लाखांपेक्षा जास्त क्षेत्रात कापूस पिकाची पेरणी झाली. यात ५० टक्के कापूस पेरणी क्षेत्रात कापसाची वाढ खुंटली आहे. तर अनेक ठिकाणी झाडांवर फुलोरा आल्यानंतरही त्याची वाढ होत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. यवतमाळ तालुक्यातील चिकणी कसबा येथील अल्पभूधारक शेतकरी दीपक तायडे या शेतकऱ्याकडे ३ एकर शेती आहेत. मागच्या वर्षी ओला दुष्काळामुळे नापिकी झाली. लग्नाला आलेल्या मुलीचे लग्न करता आले नाही.

पिकांवर पिवळेपणा वाढतोय; शेतकरी चिंतेत

पावसाअभावी जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी होत असल्याने हलक्या जमिनीतील सोयाबीनला सर्वाधिक फटका बसत आहे. पाने पिवळी पडणे, झाडांची वाढ खुंटणे, पाने सुकणे आणि झाडे कोमेजणे अशी लक्षणे अनेक शेतांमध्ये दिसत आहेत. विशेषतः शेंगा भरण्याच्या अवस्थेतील पिकाला ओलावा न मिळाल्यास दाणे भरण्यावर थेट परिणाम होण्याची भीती आहे.

Yavatmal News: कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या

शेंगा भरण्याची वेळ; पाऊसच ठरवणार उत्पादन

सोयाबीनच्या उत्पादनासाठी सध्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या अवस्थेत पुरेसा ओलावा मिळाल्यास शेंगांमध्ये दाणे भरण्यास मदत होते. मात्र पावसाचा खंड आणखी वाढला तर शेंगा कमी भरणे, दाण्यांचा आकार लहान राहणे आणि परिणामी उत्पादन घटण्याचा धोका वाढणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. जर पावसाचा खंड आणखी वाढला, तर यंदाच्या सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसेल असे चित्र आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Yavatmal news soybean crop withers due to lack of rain pest attack amidst cloudy weather crop growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Agricultural Crops
  • Soyabean Rate
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
1

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.