Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Crime: डोळ्यात तिखट, चाकूने वार आणि दगडाने ठेच; संतापलेल्या पती-पत्नीने मिळून तरुणाची केली हत्या

यवतमाळमध्ये एकतर्फी अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा करत पती-पत्नीला अटक केली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 12:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • एकतर्फी संबंधातून युवकाची चाकू व दगडाने हत्या.
  • पोलिसांनी 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा करून पती-पत्नीला अटक.
  • आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.
यवतमाळ: यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीने मिळून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासात उलगडा करत पती- पत्नीला अटक केली आहे. एकतर्फी अनैतिक संबंधातून सुरु झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस ठाणे हद्दीत घडली.

काय नेमकं प्रकरण?

लासिना- वाघापूर शेतशिवार परिसरात गॅस गोदामाजवळ १५ मार्च रोजी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर कॅहकूने वार केल्याच्या खुणा तसेच दगडाने ठेचल्याचे स्पष्ट होत होते. याशिवाय डोळ्यांत तिखट टाकण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक प्रश्न उपस्थित होते मात्र पोलिसांनी कुशलतेने २४ तासात या हत्येचा उलगडा केला.

Jalna Crime: गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून 110 सिलिंडर चोरी; साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

पोलिसांना तपासादरम्यान मृतांची ओळख आतिष सुभाषराव देखमुख (वय 36, रा. गोविंद नगर, यवतमाळ) अशी पटली. मृतकाच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स आणि शेवटच्या संपर्काच्या आधारे तपासाची सूत्रे पुढे नेली. या तपासात अंकुश नागोराव खोडे (वय 43) आणि त्यांची पत्नी रुपाली अंकुश खोडे (वय 38, रा. दांडेकर लेआउट, यवतमाळ) यांच्यावर संशय बळावला.

जीवे मारण्याच्या धमक्या

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आले की, मृतक आतिश देशमुख याचे रुपाली खोडे हिच्याशी पूर्वी संबंध होते. मात्र नंतर संबंध तुटल्यानांतर देखील आतिश तिला वारंवार संपर्क करत होता. तो तिच्यावर पुन्हा संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता, तसेच तिच्या पाटील जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.

ओतूरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार; वर्गात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

या सततच्या त्रासाला कंटाळून पती-पत्नीने मिळून आतिशचा काटा काढण्याचे ठरवले. १४ मार्च रोजी आतिशला वाघापूर शेतशिवारात बोलावले. तेथे त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी डोळ्यांत तिखट टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.

आरोपी अटकेत

या प्रकरणी मृताचे काका पंजाबराव मारोतराव देशमुख यांच्या तक्रारीवरून लाडखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.

  • Que: मृत युवक कोण होता?

    Ans: आतिश सुभाषराव देशमुख (वय 36) असे मृतकाचे नाव आहे.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: एकतर्फी संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली.

Web Title: Yavatmal crime chili powder thrown in eyes stabbed with a knife and crushed with a stoneenraged husband and wife jointly murder a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • crime
  • Yavatmal
  • Yavatmal Crime

संबंधित बातम्या

Jalgaon Crime: भुसावळमध्ये प्रेमविवाहाचा संताप; तरुणाला नग्न करून लोखंडी रॉडने गावभर मारहाण, 5 जण अटकेत
1

Jalgaon Crime: भुसावळमध्ये प्रेमविवाहाचा संताप; तरुणाला नग्न करून लोखंडी रॉडने गावभर मारहाण, 5 जण अटकेत

Navi Mumbai: पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, शिक्षिकेच्या छळामुळे विद्यार्थ्यांनी उचलला टोकाचा पाऊल
2

Navi Mumbai: पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, शिक्षिकेच्या छळामुळे विद्यार्थ्यांनी उचलला टोकाचा पाऊल

Mumbai Crime: दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक
3

Mumbai Crime: दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक

Buldhana Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत
4

Buldhana Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.