
रेशनच्या ई-केवायसीला लागला 'ब्रेक'!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण
यवतमाळ रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ८१७अद्याप १९.२८ टक्के लाभार्थी या प्रक्रियेपासून दूर आहेत.जिल्ह्यात रेशनच्या माध्यमातून शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. मात्र, ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित लाभार्थ्याची पात्रता तपासणी होऊन भविष्यात रेशनवरील लाभांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडून ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सातत्याने आवाहन केले जात आहे. नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे अनेक शिधापत्रिकाधारक जिल्ह्याबाहेर अथवा गावाबाहेर वास्तव्यास आहेत.लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही.(फोटो सौजन्य – AI)
समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा
जिल्ह्यातील एकूण २० लाख ७८ हजार ९८५ लाभाथ्यापैकी १६ लाख ७८ हजार १६८ जणांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची पूर्तता ८०.७२ टक्क्यांवर पोहोचली असून, १९.२८ टक्के लाभार्थी प्रक्रियेपासून दूर आहे. त्यामुळे त्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरवठा विभागाने विशेष मोहीमही राबविली आहे.
दरम्यान, प्रलंबित ई-केवायसीमध्ये पाच वर्षांखालील बालकांचा वाटा किती आणि प्रत्यक्षात बोगस अथवा अपात्र लाभार्थी किती, याची पडताळणी पुरवठा विभागाकडून सुरू आहे. तालुकानिहाय कामगिरीचा विचार केला असता कळंब तालुक्याने ८७.४० टक्के ई-केवायसी पूर्ण करून आघाडी घेतली आहे. त्यानंतर वणी ८५.७७ टक्के, दारव्हा ८५.५४ टक्के, मारेगाव ८४.६२ टक्के आणि यवतमाळ ८३.२८ टक्के अशी कामगिरी आहे. मात्र, काही तालुक्यांमध्ये अद्याप मोठ्या संख्येने ई-केवायसी प्रलंबित असल्याने जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान कायम आहे.
लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनीही संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांनी लाभार्थ्यांनी ई-केवायसीकडे दुर्लक्ष न करता ती तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.