crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीमध्ये कौटुंबिक वादातून कडाक्याचं भांडण झाला. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घृण हत्या केली. मृतकाचे नाव इंद्रकला विजय जयस्वाल (वय अंदाजे 38) असे आहे. आरोपी पतीचं नाव विजय जयस्वाल असं आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून यवतमाळ जिल्हा हादरला आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यात ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय जोमात; पोलिसांची ‘डोळेझाक’ कार्यपद्धत संशयात
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये सातत्याने वाद सुरु होते विजय जयस्वाल आपल्या पत्नीवर सातत्याने संशय घेत होता. त्यामुळे नेमहीच दोघांमध्ये भांडण होत होते. बुधवारी हा वाद विकोपाला गेला आणि पतीने डोक्यात सिलेंडर घालून पत्नीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादाच्या दरम्यान संतापलेल्या विजयने घरात असलेला गॅस सिलेंडर उचलून थेट पत्नी इंद्रकला यांच्या डोक्यात जोरात वार केला. हा वार एवढा जोरदार होता की त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी हा तेथून पळून गेला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्यामाहितीवरून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात विजय जयस्वालविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस कोठडी मिळवण्याची प्रकारीया सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
धर्म स्वीकार नाहीतर….; पुण्यात धर्मांतरासाठी 19 वर्षीय विवाहितेवर दबाव
पुण्यात १९ वर्षीय विवाहितेला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्या घरातून दबाव टाकण्यात आला होता. या प्रकरणी पीडितेने समर्थनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची सगळी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर हे धक्कदायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्यता माहितीनुसार, पीडितेच्या नंदेने तिला सातत्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पडण्याच्या प्रयत्न केला. मात्र महिलेनं धर्म स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली, शारीरिक मारहाणी करण्यात आली. एवढेच नाही तर, फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिलीकी मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस, जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर, तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. त्यांनतर महिलेने पोलीस ठाणे गाठत महिलेच्या ननंद आणि फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.