विहिरीच्या पाण्यात जीव देऊन जीवनयात्रा संपवली
येवला : सध्या ऑनलाईन गेमची अनेकांना सवय लागली आहे. काहींना तर याचं एकप्रकारे व्यसनच लागले आहे. या ऑनलाईन गेमच्या अतिआहारी गेलेले अनेक तरुण आत्महत्या करत असल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. आता याच पब्जीचे लोण ग्रामीण भागातही पसरल्याचे दिसून येत असून, पब्जीच्या या खेळाने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना येवला तालुक्यातील देवळाणे येथे घडली.
यशराज बोर्डे असे या तरुणाचे नाव असून, विहिरीच्या पाण्यात जीव देऊन त्याने पब्जीच्या खेळापायी आपली जीवनयात्रा संपवली. यशराजला पब्जी या मोबाईल गेमचे गंभीर व्यसन लागले होते आणि त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय ग्रामस्थांसह पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यशराज या तरूणाने जीवनयात्रा संपवण्यापूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्याने आपल्या मानसिक अवस्थेबद्दल सविस्तरपणे लिहिले आहे. ती चिठ्ठी वाचल्यानंतर तो खूपच निराश आणि तणावात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
हेदेखील वाचा : लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड
दरम्यान, घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना त्यांनी समजताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत यशराजचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवला. येवला तालुका पोलिसांत या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
ऑनलाईन गेममुळे बळी गेल्याने हळहळ
यशराजच्या मृत्यूने देवळाणे गावावर शोककळा पसरली असून, ग्रामीण भागातील तरुणाईही ऑनलाईन गेमच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेत एका तरूणाचा नाहक बळी गेला आहे.
पुण्यातही तरुणाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला. रात्री वसतिगृहातील एका खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Bhandara Crime News:आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, वारंवार अत्याचार केला, अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि…; भंडाऱ्यातील प्रकार