Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

कर्नाटक राज्यात ४०० कोटी रूपयांच्या कथित कंटेनर लूट प्रकरणी गुन्हा दाखल केल होता. या गुन्ह्यात संशयितांना क्लीन चिट देवून संपुर्ण प्रकरणात 'क्लोजर' रिपोर्ट तयार करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास CID कडे देण्यात आला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 01, 2026 | 04:57 PM
NASHIK NEWS

NASHIK NEWS

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटक राज्यात ४०० कोटी रूपयांचं कथित कंटेनर लूट प्रकरण
  • या गुन्ह्याचा तपास CID मार्फत करण्याचा निर्णय
  • SITच्या अहवालास वकीलांची हरकत
Nashik News:  कर्नाटक राज्यात ४०० कोटी रूपयांच्या कथित कंटेनर लूट प्रकरणी गुन्हा दाखल केल होता. या गुन्ह्यात संशयितांना क्लीन चिट देवून संपुर्ण प्रकरणात ‘क्लोजर’ रिपोर्ट तयार करण्यात आला होता. हा रिपोर्ट करणारे नाशिक ग्रामीण पोलिसांना पोलीस महासंचालकांनी झटका दिला आहे. या प्रकरणातील तक्रार व काही तथ्यांचा विचार करता या गुन्ह्याचा तपास CID मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

स्थानिक पातळीवर विशेष तपास पथक

या गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी स्थानिक पातळीवर विशेष तपास पथक गठीत केले होते. त्यानुसार काही संशयितांना ताब्यातही घेवून पोलीस कोठडी देण्यात आली होती. तपासाअंती SITने हा गुन्हा ‘बनावट’ असल्याचे सांगत तो बंद करण्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र राज्य पोलीस मुख्यालयाने केलेल्या अंतर्गत पुनरावलोकनात SITच्या तपासावर गंभीर तांत्रिक आणि प्रक्रियात्मक बोट ठेवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तपास CIDकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी याला दुजोरा दिला आहे. तपासातील त्रुटींनंतर व पुनरावलोकनातील सविस्तर निष्कर्ष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांना कळवण्यात आले त्यानंतर तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पोलीस महासंचालक कार्यालयाने नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना सर्व मूळ कागदपत्रे पुरावे आणि केस डायरी तात्काळ सीआयडीकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

SITच्या अहवालास वकीलांची हरकत

ग्रामीण पोलिसांच्या एसआयटीने अवघ्या २५ दिवसांत तपास पूर्ण करून १२ फेब्रुवारी रोजी इगतपुरी न्यायालयात सी-सभरी म्हणजेच गुन्हा बनावट असल्याचा अहवाल दाखल केला होता, कथित लूट आणि अपहरणाची घटना घडलीच नसल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. मात्र राज्य पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तपासात अनेक त्रुटी आढळल्या त्यात सरकारी वकिलांचा विरोध असताना सहाय्यक सरकारी वकिलांनी या प्रकरणात कलम १८९ लावण्यास आणि तपास बंद करण्यास विरोध दर्शवला होता तरीही एसआयटीने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. इतक्या मोठ्या रकमेच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या २५ दिवसांत घाईघाईने पूर्ण करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकमधील एका व्यक्तीने घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, कर्नाटकातून गुजरातच्या एका आश्रमात नेले जाणारे ४०० कोटी रुपयांचे चलन म्हणजेच बाद झालेल्या दोन हजाराच्या नोटा कर्नाटक मधील चौरला घाट परिसरात लुटले गेले आणि संबंधितांचे अपहरण करण्यात आले असा आरोप होता. या प्रकरणात बिल्डर किशोर सावला, हवाला ऑपरेटर विराट गांधी आणि एका रेल्वे पोलीस अधिकाऱ्यासह आठ जणांना अटक करण्यात आली होती.

Web Title: Nashik 400 crore container loot case cid investigation dgp decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • local update
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela : भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार
1

Nashik Kumbh Mela : भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.