
'मला शोधू नको, आईची काळजी घे'; चिठ्ठी लिहून तरुण झाला बेपत्ता
शिरूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता शिरूर तालुक्यात एका व्यक्तीने चिठ्ठी लिहून घर सोडले. ही घटना शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद झाली असून, तपास केला जात आहे.
बेपत्ता होण्यापूर्वी या व्यक्तीने एक चिठ्ठी लिहिली होती. आता हीच चिठ्ठी चर्चेचे कारण ठरली आहे. या चिठ्ठीत त्याने लिहिले की, ‘भाऊ, मला शोधू नको, आईची काळजी घे’. त्यानंतर संबंधित व्यक्ती बेपत्ता झाली. या व्यक्तीच्या भावाने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माहिती दिली आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील धर्मशील वानखडे याची आई व भाऊ संघसिल त्याच्याकडे आलेला असताना भाऊ संघसिल शांत राहत होता. त्यांनतर धर्मशील कामाला गेलेला असताना अचानक त्याचा भाऊ संघसिल घरातून बेपत्ता झाला. त्यांनतर त्याच्या आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता संघसिल कोठेही मिळून आला नाही. त्यांनतर सायंकाळी संघसिल वहीवर काहीतरी लिहित असल्याचे घरातील लहान मुलांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Pimpri-Chinchwad Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; चिंचवडमध्ये समाजिक कार्यकर्त्याचा निर्घृण खून?
त्यानंतर सत्वनी वही तपासली असता वहीमध्ये ‘भाऊ व आई तुम्हाला मी कधी दिसणार नाही, मला शोधायची गरज नाही, आईची काळजी घे, आईला पाहणारा, मुलगा नाही मी वापस येणार नाही, तुम्हाला तकलिब दिल्याबद्दल माफ करणे’ असा मजकूर लिहून सही केलेली चिठ्ठी मिळून आली. याबाबत धर्मशील बाबाराव वानखडे (वय ४५ वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सिंदखेड ता. बार्शी जि. अकोला) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माहिती दिली.
बेपत्ता संघसीलचे वर्णन वय ४२ वर्षे, गोल चेहरा, रंग काळा सावळा, काळे केस, अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स प्यांट असे वर्णन असून बेपत्ता इसामाबाबत काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.