Pimpri-Chinchwad Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; चिंचवडमध्ये समाजिक कार्यकर्त्याचा निर्घृण खून?
Pimpri-Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आला आहे. नकुल भोईर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो समाजिक कार्यकर्ता होता. तर आरोपी महिलेचे नाव चैताली भोईर असे आहे. नकुल भोईर पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Sangali News: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात कुणी बदलले? सांगतील राजकारण पेटणार
मिळालेल्या माहितीनुसार, पती समाजिक कार्यकर्ता होता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होती. नकुल भोईर वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. काल सांयकाळी नकुल आणि त्याच्या पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. पण संतापलेल्या पत्नीने ओढणीने पतीची गळा दाबून हत्या केली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाला. याच वादातून पत्नीने नकुलचा निर्घृण खून केला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेत तिची चौकशी सुरू केली.
अधिक माहितीनुसार, नकुल भोईरचा पिंपरी-चिंचवड भागात मोठा जनसंपर्क होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि वेगवेगल्या सामाजिक चळवळीत सक्रीय होता. चिंचवडगाव आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नकुल नेहमी आग्रही असायचा. पण पत्नीनेच त्यांची हत्या केल्यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
चिंचवड परिसरातील एका घरात मध्यरात्री सुमारे दोन वाजता एका धक्कादायक घटनेची नोंद झाली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नकुल भाईर यांचा खून त्यांच्या पत्नीने केला आहे. घटना समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
चिंचवड परिसरात नकुल आणि चैताली भाईर हे दांपत्य मिळून साडी सेंटर चालवत होते. चैताली भविष्यात नगरसेविका होण्याचे स्वप्न पाहत होती आणि समाजसेवेतही सक्रिय होती. चैतालीने पती नकुलच्या संशयी स्वभावाला कंटाळून त्याचा खून केला. ही घटना अनेकांना धक्कादायक ठरली आहे, कारण दांपत्याचा व्यवसाय एकत्र चालत होता आणि भविष्यातील राजकीय महत्वाकांक्षा दोघांनाही जोडलेले होते.
घटना मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिस तपासात ही हत्या व्यक्तिगत तणाव आणि महत्वाकांक्षेच्या पार्श्वभूमीवर घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.






